खुनातील गुन्हांतील आरोपी एम आय डी सी पोस्टेचे गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात


  मुुुु, संपादक जलगांव        उप संंपादक अकोला
   रशीद शेख बागबान         इरफ़ान अहमद शेख
     8484819485                 9766221455

जळगाव प्रतिनिधि,समीर शाह 

एम आय डी सी पोस्टे सिसिटीएनएस नं.383/2023 भादवि कलम 302,120 [ब].34 प्रमाणे दिनांक 13.06.2023 रोजी 16.59 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील फिर्यादी नामे प्रकाश रघुनाथ चौधरी य 62, रा. रामेश्र्वर कॉलणी जळगाव यांनी दिनांक 11.06.2023 रोजी दुपारी 2.00 ते 3.00 वाजेच्या दरम्यान जळगाव शहरातील हॉटेल जान्हवी जवळ व सायंकाळी 04.00 वाजेचा सुमारास रामेश्वर कॉलनी येथील फिर्यादी राहत असलेले गल्लीत जुना भांडण्याचे कारणावरुन यातील आरोपी नामे 1] सचिन कैलास चव्हाण वय 23, 2] तुषार उर्फ सोन्या विजय पाटील वय 24 3] सनी उर्फ फौजी बाळकिशन जाधव वय-36, 4] कुदंन रविंद्र पाटील वय-30 सर्व रा. रामेश्वर कॉलणी जळगाव अशांनी कट कारस्थान करुन फिर्यादीचा मुलगा [मयत ] चेतन प्रकाश चौधरी वय 23 वर्षे यास जळगाव शहरतील प्रियंका किराणा जवळ जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन काहीतरी विषारी पदार्थ पाजला असुन मुलगा [मयत]चेतन यांच्यावर औषधउपचार दरम्यान तो मयत झाले बाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हांतील आरोपी यांची मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सो यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन एम आय डी सी पोस्टेचे पोना विकास सातदिवे, पोकों छगन तायडे, ईश्वर भालेराव व पोहेकॉ चालक इम्तीयाज अली खान असे शासकीय वाहनाने जळगाव शहरातील मेहरून बगीचा ठिकाणी आले असता यातील आरोपी नामे 1] सचिन कैलास चव्हाण वय-23, 2 ] तुषार उर्फ सोन्या विजय पाटील वय-24 3] सनी उर्फ फौजी बाळकिशन जाधव वय-36, 4] कुदंन रविंद्र पाटील वय-30 सर्व रा. रामेश्वर कॉलणी जळगाव हे शासकीय वाहन पाहुन पळु लागल्याने सदर पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्यांचा पाठलाग करुन काही अंतरावरून आरोपीतांना ताब्यात घेतले आहे..
सदरची कार्यवाही मा. श्री एम राजकुमार सो., जळगाव जिल्हा व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी सो., तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित सो., जळगाव भाग जळगाव व मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हीरे सो. यांचे मार्गदर्शनाखाली पो उप निरी दिपक जगदाडे, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, पंकज पाटील, पोकों छगन तायडे, ईश्वर भालेराव, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे, पोहेकॉचालक इम्हीयाज खान अशांनी केली आहे. गुन्हांचा तपास पोलीस निरीक्षक श्री जयपाल हीरे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप निरी दिपक जगदाडे करीत आहेत,


Post a Comment

0 Comments