इकरा युनानी मेडिकल कॉलेज शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 3 ग़ोल्ड मेडल

जलगांव:(शाह एजाज़ गुलाब)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष 2022-23 बी.यु.एम.एस.  अभ्यासक्रमाचे लेखी परिक्षा घेण्यात आल्या त्या मध्येइकरा युनानी मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्षात काझी नुर फातेमा अजिमुद्दीन  हिला गोल्ड मेडल मिळाले. द्वितिय वर्षात खान सारामोहम्मद कैसर  हिला गोल्ड मेडल मिळाले आणि तृतियवर्षात दानिया जावेद शेख हिला गोल्ड मेडल मिळाले. तसेच इकरा युनानी मेडिकल कॉलेजचा बी.यु.एम.एस. अभ्यासक्रमाच्या विषयानुसारमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विषय टॉपर म्हणुन महाविद्यालयाचे विद्यार्थीउत्तीर्ण झालेले आहे. महाविद्यालयातील गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थींनीचे पुष्पगुच्छ  देऊन संस्थेचे अध्यक्ष अ. करीम सालार व सोसायटीचे अब्दुल अजीज सालार, अमीनुद्दिन बादलिवाला, अ. मजीद जकेरिया,जाबिउल्ला शाह, तारीक अन्वर, अन्य पदाधिकारी यांनी अभिनंदन व कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य शोएब शेख व शिक्षकांनी पुष्पगुच्छ  देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments