रशीद शेख बागबान इरफ़न अहमद शेख
8484819485 9766221455
*पातूर तालुका प्रतिनिधी सैयद हसन बाबू*
अकोला जिला के पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिर्ला शेत शिवार राज्य महामार्ग 161 च्या पूर्वेस असलेल्या श्री मानमोडे यांच्या शेतातील निंबाचे झाडाला साडीच्या काठपदराने गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 2 जून 2023 रोजी सकाळी आढळून आल्याने पातुर शहरात खळबळ उडाली आहे
सदरचा मृतदेह हा लटकलेल्या अवस्थेत पातुर शहरातील नागरिकांना दिसला यावरून शिर्ला ग्रामपंचायतचे सदस्य मंगल दादा डोंगरे यांनी ठाणेदार हरीश गवळी यांना ही माहिती दिली त्यावरून पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन पोटे, तारासिंग राठोड, पोलीस कर्मचारी प्र. शि.शिरसाट, सुशील वाकोडे, श्रीकांत पातोंड यांनी घटनास्थळावर येऊन या मृतदेहाची ओळख पटवून घेतली यामध्ये सदर ऑटो चालक असलेला आणि गळफास घेतलेला हा युवक पातुर येथील देवेश किसन उंबरकर व 20 वर्ष राहणार पाटील मंडळी पातुर असे असल्याचे पोलीस सूत्राकडून समजले
पातुर पोलिसांनी मृतदेहाला खाली घेतले त्यानंतर पंचनामा करून उत्तरीय तपासणी करता अकोला सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले आहे
पातुर पोलिसात याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून यामध्ये पुढील तपास पातुर पोलीस करत असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून प्राप्त झाली आहे
0 Comments