शेख हक्कानी ( प्रतिनिधि)
दौंड नगरपालिकेत प्रत्येक विभागात भ्रष्टाचार. एका परिवाराच्या हातचे बाहूले. दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डाॅ. संतोष टेंगले का पाठीशी घालत आहे. भ्रष्टाचाराला, ठेकेदाराना, दौंड नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांना. दिड वर्षा पासून दौंड नगरपालिकेवर प्रशासन कारभार करत आहे. तरी का लावावी लागते मुख्याधिकारी डाॅ. संतोष टेंगले यांना शाळेत हजेरी? दौंड नगरपालिकेने नुकत्याच घनकचरा संकलन व व्यवस्थापन करणे कामी घंटा गाड्या ची केली खरेदी मात्र आनेक महिने झाले तरी नवीन घंटा गाड्या दौंड शहरात दिसत नाही. मुख्याधिकारी यांना विचारले असता पासिंग चे कारण सांगत आहे. मुख्याधिकारी यांना हे माहित नाही का? अत्ता शोरूम मधून गाडी पासिंग केल्या शिवाय व नबंर प्लेट सहित गाडी शोरूम च्या बाहेर जात नाही. मगं दौंड चे मुख्याधिकारी डाॅ. संतोष टेंगले कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. दौंड च्या जनते मध्ये चर्चा घंटा गाड्या हे फक्त कागदोपत्री खरेदी मात्र गाड्याच घेतल्या नाही. हे जर खरं आसेल तर डाॅ. संतोष टेंगले यांनी यांचा खुलासा करावा. पासिंग च्या नावावर वेळ मारून नेली यांचा अर्थ मुख्याधिकारी यांना च्या संगण मताने हा भ्रष्टाचार होत आहे का?आणि जर गाड्या खरेच खरीदी केल्या असतील तर जनतेला दाखवा. घनकचरा संकलन व व्यवस्थापन करणे कामी महिन्याला मे श्री संत गाडगेबाबा महाराज बेरोजगार संस्था पुणे या ठेकेदार याला दौंड नगरपालिके कडून ९,८९,०६२ इतके देयक अदा केले जाते. तरी ठेकेदार कचरा संकलन व व्यवस्थापन करत नाही. त्याच्या वर मुख्याधिकारी डाॅ. संतोष टेंगले कुठलीच कारवाई करत नाही. जनते मध्ये हीही जोरदार चर्चा चालू आहे की ठेकेदार कागदोपत्री वेगळा आणि काम मात्र दौंड शहरातील मोठया नेत्याचा मुलगा करतो आहे. ते काम त्याचा गुलाम, अंध भक्त संभाळत आहे. आणि म्हणून मुख्याधिकारी त्याना पाठीशी घालत आहे. घनकचरा संकलन व व्यवस्थापन न करता ( दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील कचरा न उचलता ठेकेदाराला महिन्याचे बील पास.) महिन्याला ९,८९,०६२ इतके देयक अदा केले जाते मुख्याधिकारी डाॅ. संतोष टेंगले यांच्या सहिने. काम काहीच नाही पण पैसे ठेकेदाराला पोच हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. हया भ्रष्टाचाराला सुधा मुख्याधिकारी जबाबदार आहे. जनतेला शासनाचे परिपत्रक दाखवून कर वाढवायचे मात्र शासनाने नेमून दिलेल्या आपल्या जबाबदारीला बगल दयायचे. हे चालणार नाही कारण जनतेच्या करातून तूमचा आणि ठेकेदार यांनचा पगार होतो. लोक शाही मध्ये जनता मालक आणि तूम्ही त्याचे नौकर आहात हे विसरू नका. मुख्याधिकारी यांच्या आदेशाला ठेकेदार यांच्या कडून केराची टोपली तरी मुख्याधिकारी गप्प कसे काय आहे? दौंड नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक बारा मधील सर्व अंडर ग्राउंड चेंबस॔ गाळ काढणे व दौंड शहरातून वाहणारे मोठे पावसाळी गटार पावसाळा सुरू होण्या पूर्वी संपूर्ण गाळ काढून स्वछ करण्याचे मुख्याधिकारी डाॅ संतोष टेंगले यांनी दिले होते आदेश मात्र ठेकेदार यांच्या कडून त्याला केराची टोपली. अदयाप गाळ व नाले सफाई चे काम चालू झाले नाही शेवटची २० जून २०२३ तारीख आहे. दौंड नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे मुकादम श्री.रवींद्र जाधव हे असून मुख्याधिकारी, मुकदम जाधव आणि ठेकेदार मिळून भ्रष्टाचार करत आहे. दौंड च्या नागरिकांनी कष्ट करून देशाच्या, राज्याच्या, व स्थानिक स्वराज्य संस्था च्या माध्यमातून गाव ,शहर आणि जिल्ह्याच्या उनती साठी विकासासाठी जो कर भरला आहे. त्याचा दौंड नगरपालिके कडून केला जातोय दूरूपयोग मुख्याधिकारी, मुकदम आणि ठेकेदार तसेच घंटा गाड्या खरेदी बाबत सखोल चौकशी होणार का? अत्ता सध्या दौंड नगरपालिकेवर प्रशासन कारभार करत आहे. हया वर कायदयाने व नियमाने दौंड तालुक्याचे लोकप्रतिनिधी मा.आमदार यांना ची जबाबदारी आहे. मात्र ते दौंड नगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर काहीच बोलत नाही. काहीच कारवाई करण्याची जिल्हाधिकारी, उपविभागीय आयुक्त व नगर विकास मंत्रालय यांना मागणी करत नाही. आमदार यांना जनता निवडून देते जनतेचे प्रतिनिधी म्हणून पाच वर्ष जनतेचे काम काज करत आसलेले आधिकारी यांच्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच जनतेच्या हिताचे कायदे विधीमंडळात बनवण्या साठी. त्याचा मोबदला सुधा जनता आपल्या करा मधून आमदार यांना पगार व इतर सुखसोयी देऊन करते. पाच वर्षे कार्यकाळ संपल्या नतंर पुढील आयुष्य आनंदी जावे म्हणून जनतेच्या करा मधून पेंनशन सुधा दिली जाते. तरी आमदार या कडे काना डोळा करत आसतील. जनतेला त्रास देण्याच्या हेतूने मुख्याधिकारी, आधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांना वाचवत आसतील यांना पाठीशी घालत असतील तर दौंड च्या जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे. आपण योग्य व्यकती पगार देऊन कामावर ठेवला आहे का? आणि पुढील काळात आपण काय केले पाहिजे. बाकी दौंड ची जनता सुज्ञ आहे आणि हुशार आहे.
0 Comments