जळगावात सोन्याचा ‘रिंग स्वॅप’ स्कॅम उघड; महिला चोरटी पकडली

जळगाव:
 गेल्या दोन सप्ताह पूर्वी जळगावच्या तीन तीन ज्वेलर्स दुकानाला लक्ष्य करणारी आणि हातचलाखीने सोन्याच्या अंगठ्या बदलणारी एक रहस्यमय महिला पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली होती.
RC बाफना ज्वेलर्स, भंगाळे गोल्ड आणि रिंग रोडवरील गाळगीळ अँड सन्स या दुकानांत एकाच पद्धतीने झालेल्या चोरींनी व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली होती.
CCTV फुटेजमध्ये दिसणारी महिला नकली अंगठ्या ठेवून मूळ सोन्याच्या अंगठ्या घेऊन गायब होत असल्याचे स्पष्ट दिसले.

27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान झालेले हे गुन्हे एकाच टोळीचे असावेत असा संशय पोलिसांना होता.
तपास जसजसा पुढे गेला तसतशी हीच महिला छत्रपती संभाजीनगरातील ज्वेलरी दुकानातही अशीच चोरी करीत असल्याची नोंद मिळाली.

या सर्व गुन्ह्यांच्या धाग्यांना जोडत शनिपेठ पोलिसांच्या तपास पथकाने मोठी झेप घेतली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक बरेली (उत्तर प्रदेश) येथे पोहोचले.
तिथे त्यांनी नावं लकी शर्मा उर्फ (लकी शिवशक्ती पाठक) या महिलेला ताब्यात घेतले.
तिच्याकडून तिन्ही गुन्ह्यांतील एकूण 61.67 ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या अंगठ्या, किंमत 6 लाख 60 हजार रुपये हस्तगत करण्यात आल्या.

या कारवाईत तपास पथकासह नेत्रम विभाग आणि तांत्रिक विश्लेषण टीमचे विशेष सहकार्य मिळाले.
आरोपी महिला सध्या शनिपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून पुढील तपास सुरु आहे.
ही कामगिरी जळगाव पोलिसांच्या सतर्क तपासाची आणि अचूक समन्वयाची ठळक उदाहरण ठरली आहे.

Post a Comment

0 Comments