माणिकराव पालोदकर विद्यालयाचा 93 टक्के निकाल

माणिकराव पालोदकर विद्यालयाचा 93 टक्के निकाल ,
 मख्य संपाादक जलगांव        उपसंपादक अकोला
 रशीद शेख बागबान              इरफ़ान अहमद शेख
   8484819485                    9766221455

   फर्दापुर से शेेख हक्काने की रिपोर्ट,,,,

फर्दापुर येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड संचलित माणिकराव पालोदकर विद्यालय फर्दापुर ता. सोयगाव या विद्यालयात मार्च 2023 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 93 टक्के लागला. या परीक्षेसाठी एकूण 105 परीक्षार्थींनी आवेदन पत्रे भरली होती. त्यापैकी 98 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेत. कु. तांगडे ऋतुजा गजानन या विद्यार्थिनीने 91.80% गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. दौड प्रथमेश कैलास यास 90.80% गुण मिळवून त्याचा द्वितीय क्रमांक आला तर कु. कोटीये प्रतीक्षा संदीप हिला 90.06% गुण मिळवून तृतीय क्रमांक आला. काळे दीक्षा दिलीप 89%, सोनवणे पायल दिनेश 87.80%, भुजबळ प्रतिक्षा सागर 87.40%, दामोदर त्रिशला शरद 83.20%. शेख फैज़ान शेख हक्कानी 65.40%सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड चे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब, सचिव तथा सिल्लोड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर साहेब, प्रशासकीय अधिकारी तथा नॅशनल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रईस खान सर, संचालक शेख जावेद हाजीसाहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. के. शिंदे, नॅशनल विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद सोळुंके, के. आर. पाटील, पी. आर. पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील उज्ज्वल आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments