रशिद शेख बागबान इरफ़ान शेख
8484819485 9766221455
*पातुर तालुका प्रतिनिधी सैयद हसन बाबू*
पातुर येथील ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाचे सभागृहामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतची महत्त्वपूर्ण सभा
17 जून 2023 रोजी संपन्न झाली
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष दिनेश पांडे होते तर हेमंत जकाते जिल्हासंघटन मंत्री, मनोज अग्रवाल जिल्हा सचिव मंजित देशमुख वीज ग्राहक संघ प्रमुख, प्रमोद बोरकर गॅस व पेट्रोल संघ सचिव आदींची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी सभेमध्ये पातुर तालुक्याची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष दिनेश पांडे यांनी जाहीर त्या,
यामध्ये
पातुर तालुका अध्यक्षपदी पातुर येथील ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले यांची निवड करण्यात आली तर संघटन मंत्री म्हणून डॉ. श्रीकांत बोरकर, सह संघटन मंत्री प्रा. प्रशांत निकम, उपाध्यक्ष भारतीताई गाडगे, सचिव पदी संदीप गिर्हे, तालुका सहसचिव पदी नारायण रावजी अंधारे,
कोषाध्यक्ष डॉ शांतीलाल चव्हाण, सहकोशाध्यक्ष सुहास देवकर तर महिला प्रमुख पदी
प्रा करुणा गवई, तालुका संपर्कप्रमुख कृष्णरावजी घाडगे तर तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी प्रेमचंद शर्मा आणि
प्रा वसंत गाडगे,
सौ ज्योतीताई दाभाडे, चंद्रशेखर सुगंधी, गोपाल चतरकर यांची तालुका कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली आहे यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीचे स्वागत आणि अभिनंदन सत्कार जिल्हा पदाधिकाऱ्यांनी करून मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा. सौ.करुणा विठोबा गवई तर आभार प्रदर्शन डॉ. श्रीकांत बोरकर यांनी यावेळी केले कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक गीताने करण्यात आली तर समारोप पसायदानाने करण्यात आला आहे
0 Comments