मनमाड रेल्वे स्टेशन येथुन रेल्वेने प्रवास करीतअसताना पोलीसांच्या ताब्यातुन पळुन गेलेला १६ गंभीर गुन्हयातील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला, आरोपी गणेश देविदास शिंदे यास १२ तासाच्या आत अटक.

मनमाड रेल्वे स्टेशन येथुन रेल्वेने प्रवास करीत असताना पोलीसांच्या ताब्यातुन पळुन गेलेला १६ गंभीर गुन्हयातील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला, आरोपी गणेश देविदास शिंदे यास १२ तासाच्या आत अटक.
   मुुुुख्य संपादक जलगाँव               उप संंपादक
    रशीद शेख बागबान              इरफ़ान अहमशेख
     8484819485                    9766221455

 जलगाँव प्रतिनिधि,,,,,,,

दिनांक ०७/०६/२०२३ रोजी खंडणी विरोधी पथकाच्या गुन्हयातील खटला क्रमांक ५८३ / पीडब्ल्यू / २०२२ मधील न्यायबंदी आरोपी गणेश शिंदे यास मा. अति. मुख्य महानगर दंडाधिकारी, ३७ वे न्यायालय, एस्प्लीनेड, मुंबई यांच्या न्यायालयात अमरावती पोलीसांकडून हजर करण्यात आले होते. मा. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर त्यास मुंबईवरुन ट्रेनने अमरावतीला परत घेवुन जात असताना नाशिक रोड स्टेशन नंतर आरोपीने पोबारा केला. पोलीसानी ट्रेनमध्ये त्याचा शोध घेतला असता तो मनमाड / भुसावळ स्टेशनवर उतरुन पळून गेला असून त्याबाबत शेगाव रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. कायदेशिर रखवालीतुन पळुन गेलेल्या आरोपीतावर मोक्का कायदया अंतर्गत ०२ गुन्हे, खंडणी - ४, शरीरा विरुध्दचे ९ व कायदेशीर रखवालीतुन पळुन गेल्याबाबत-१ असे एकूण १६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कायदेशिर रखवालीतुन पळुन गेलेला आरोपी हा जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
अमरावती एक्सप्रेस मधुन कायदेशिर रखवालीतुन पळुन गेलेला आरोपी गणेश शिंदे याचा शोध घेण्यासाठी सदरची माहिती कळताच मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई यांनी गुन्हे शाखेची वेगवेगळी चार पथके तयार करुन त्यांना सदर आरोपीतास तात्काळ अटक करावी असे आदेश दिले. त्यावरुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचे नातेवाईक, आरोपीचे साथीदार, आरोपीचे लपण्याची ठिकाणे, येथे शोध घेत असताना आरोपी गणेश शिंदे हा सायन परिसरात आला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे चारही पथके सायन परिसरात शोध घेत असताना खंडणी विरोधी पथकाचे पो. नि. थोरात व पो. नि. सुनील पवार यांना तो टॅक्सीतुन आल्याचे दिसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडण्यापुर्वी त्यास खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यास खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात आणुन त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने सदरचे कृत्य हे नैराशातुन केल्याचे सांगीतले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, मुंबई श्री. फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शशी कुमार मीना, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) डॉ. श्री. बाळसिंग राजपुत, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डी (विशेष) श्री. रामचंद्र लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील व. पो. नि. ज्ञानेश्वर गणोरे, पो. नि. सुनिल पवार, पो. नि. अरुण थोरात, सपोनि मारुती कदम, पोउनि जालिंद्र लेंभे, पो.ह. क्र. विजय थोरात, महेश धादवड, सचिन डुबल, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्र. पो. नि. इंद्रजित मोरे, पो. नि. पाटील, स.पो.नि. अजय बिराजदार, स.फौ. परब, पो. ह. ज्ञानेश्वर मिंडे, शरद शिंदे, प्रमोद मोरे, पो.शि. जगताप व पथक यांनी पार पाडलेली आहे.

Post a Comment

0 Comments