पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील पीडित मुलगी गेल्या आठ महिन्यापासून न्यायापासून वंचित,
आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर देखील केली जिल्हा पोलीस अधिक्षक जळगाव यांच्या कडे तक्रार
मुख्य संपादक जलगाँव उप संपादक अकोला
रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
फर्दापुर( प्रतिनिधी)हक्कानी शेख किरिपोर्ट
फर्दापुर, पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवरील झालेल्या अन्यायाविरुद्ध मागील काही महिन्यापासुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस कार्यालयाला तक्रार करून देखील आज पर्यंत न्याया पासून सदर पीडित मुलीला वंचित राहावे लागले असल्याची तक्रार. सदर पिडीत मुलीने जिल्हा पोलीस अधिक्षक जळगांव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
सदर मुलीने तक्रार अर्जात असे म्हटले की, सासरकडील व सावत्र आई- विरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन न्यायाची मागणी केली होती. परंतु सदर पीडित अन्यायग्रस्त अल्पवयीन मुलगी वय.16.वर्षे हिच्या तक्रारीकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अन्याय करणाऱ्या लोकांनाच पाठीशी घालून प्रकरण दडपल्याने सदर मुलीने जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे दिनांक: 0८/06 /2023 रोजी एका लेखी दिलेल्या तक्रार अर्जात केली असल्याची माहिती मिळालेली आहे.
सदर पीडित मुलीने जिल्हा पोलीस अधिक्षक जळगाव यांना दिलेल्या तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, मी लहान असतानाच माझी जन्मदेती आई मरण पावली व आम्हाला आईचे प्रेम मिळावे म्हणून माझ्या सख्या मावशी सोबत वडिलांनी लग्न केले,मात्र सावत्र आईने सावत्र आई सारखा नेहमी मला त्रास दिला व वडिलांना सांगून इ.8.वी पासून माझी शाळा बंद केली ,मला नेहमी शेती कामाला पाठवून मिळणारे पैसे स्वतः जवळ ठेवले,व मिळणाऱ्या पैशातुन समाधान झाले नाही म्हणून माझ्या वडिलांच्या मागे लागून माझे लग्न मी 14 वर्षाची असतानाच भडगाव येथील एका तरुणाशी करून दिले,व आर्थिक देवाण-घेवाण करून माझी पूर्ण जबाबदारी झटकून मोकळे झाले.
असे तक्रारीत नमुद करुन ती पुढे म्हणते की,
सासर कडील लोकांनी माझा मोठ्या प्रमाणात छळ केला. आई बापानेच माझ्या कडे पाठ फिरवल्याने लहान असताना आईचे प्रेम देणारी माझी आजी मला वाचवू शकते म्हणून आजीला मी बोलावून घेतले. आजीने भडगाव येथून माझी कशी तरी सुटका करून मुंबई येथे आत्या कडे मला घेऊन गेली.मात्र माझ्या सावत्र आईला माहिती मिळताच तीने मला फोन द्वारे धमकवायला सुरुवात केले,व तुला भडगावलाच राहावं लागेल असा माझ्यावर दबाव बनवू लागली,मी या सर्व प्रकारामुळे अधिक भयभीत झाल्याचे आजी व आत्याच्या लक्षात येताच त्यांनी मला सोबत घेऊन पिंपळगाव हरे पोलीस ठाणे गाठले मात्र पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. मात्र आजी व आत्याने तक्रार देण्यास ठाम भूमिका घेतल्याने त्यांना तक्रार घ्यावी लागली व त्या तक्रारी वरून पिंपळगाव हरे पोलीस विभागाने मला बाल कल्याण समिती जळगांव येथे पाठवले,
व एक ते दीड महिन्यानंतर समितीने मला मुंबई येथे आत्या कडे पाठवले मात्र आज आठ महिने निघून गेलेत तरी देखील मला न्याय मिळाला नाही म्हणून आजीने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला मात्र गावाकडे स्वतःच्या घरात जाण्यापासून माझ्या सावत्र आईने माझ्या आजीला वंचित ठेवले व तुझ्या नातीचा तुझ्या मुलीचा पाय आम्हाला कोल्हे गावात नको व तूच तिला भडगाव येथून घेऊन गेलीस तुला मी घरात येऊ देणार नाही असे सांगून हाकलून दिले.हा सर्व प्रकार बघून आजीने पिंपळगाव हरे पोलीस ठाणे गाठले व माझ्या नातीच्या केसचे काय झाले अशी विचारना केली असता पोलीसानी समज देत हा विषय आता काढू नका.तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक, यांनी माझ्या सावत्र आईला पोलीस ठाण्यात बोलवून घेतले व मुलीच्या सासर कडील लोकांनी किती सोने दिले ते तुमच्या सुनेला द्या. तरच सुन तुम्हाला घरात घेण्याचे म्हणते आहे.या स्वरूपाचे विषय आजी समोर काढून आजीचे मानसिक खच्चीकरण करून आपण या पुढे पोलीस ठाण्यात येऊ नये,अशी समज देऊन आजीला जाण्यास सांगितले.तक्रारीत पीडित मुलगी असेही म्हणते की माझ्या सावत्र आईला बळ देणारे पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक,हेच आहेत
त्यामुळे माझे शोषण करणारे जितके इतर लोक दोषी आहेत तितकेच त्यांना पाठीशी घालून कायद्यापासून वाचवणारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोषी आहेत त्यामुळे संबंधितांवर कार्यवाही होऊन मला न्याय मिळावा अशी पीडित मुलीने पोलीस अधीक्षक जळगाव,जिल्हा अधिकारी जळगाव,बाल हक्क संरक्षण आयोग,महिला आयोग,मानवाधिकार आयोग यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
0 Comments