ड्रायव्हरला डुलकी आल्यामुळे समृद्धी हायवेवर झाला ट्रक पलटी अपघातात 2 किरकोळ जखमी
समृद्धी हायवे अग्निशामक दल लोकेशन टोल प्लाझा कारंजा व समृद्धी हायवे 108 लोकेशन कारंजा वेळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.
  
 मुख्य संपादक जलगाँव         उप संपादक अकोला
    रशीद शेख बागबान           इरफ़ान अहमद शेख
     8484819485                    9766221455

कारंजा प्रतिनिधि,रमेश देशमुख
दि 24/6/23 पहाटे6 :30 च्या सुमारास सविस्तर वृत्त असे की सदर ट्रक क्रमांक CG14MF9411 मुबंई वरून नागपूर जाण्यासाठी निघाले असता समृद्धी हायवे टोल प्लाजा समोर अपघात लोकेशन 181 येथे ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चालक व क्लीनर जखमी झाला . 
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी हायवे लोकेशन अग्निशामक दल व समृद्धी हायवे लोकेशन 108 हे घटनास्थळी वेळीच दाखल. अपघातल्या ट्रक मध्ये ऑइलच्या कॅन असल्यामुळे पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नव्हती पण समृद्धी हायवे लोकेशन अग्निशामक दल हे वेळीचदाखल् झाल्याने पुढील अनर्थ टळला. कारण पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यावेळी समृद्धी हायवे लोकेशन अग्निशामक दलाचे विलास खानंदे धम्मदीप सूर्यवंशी सुमित दोनेकर. यांनी वेळेस आपले कर्तव्य पार पडल्यामुळे संभाव्य जीवितहानी व लाखोचे नुकसान वाचले. अपघात झालेल्या जखमी झालेल्या रुग्णांना लोकेशन समृद्धी हायवे 108 डॉ बी एस राठोड व पायलट आतिश चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयात कारंजा दाखल केले. जखमींची नावे खुर्चीद अन्सारी वय 26 कुदुस अन्सारी वय 23 रा मुबंई असल्याची माहिती प्राप्त झाली आहे,