जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा आढावा घेतला.
जन-धन योजना, पीएम किसान सन्मान निधी, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी आणि लखपती दीदी यांसारख्या योजनांमुळे देशातील कोट्यवधी नागरिकांना थेट लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
रक्षाताई खडसे म्हणाल्या की, गेल्या 12 वर्षांत देशातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे विद्युतीकरण, वंदे भारत एक्सप्रेस, मेट्रो नेटवर्क, नवीन विमानतळ तसेच ग्रामीण रस्त्यांच्या निर्मितीमुळे देशाच्या विकासाला गती मिळाली आहे.
डिजिटल इंडिया, भारतनेट आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) यांसारख्या उपक्रमांमुळे पारदर्शकता वाढून कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे.
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा उल्लेख करताना त्यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि दहशतवादविरोधी कारवायांचा उल्लेख केला. तसेच भारताने जागतिक स्तरावर जी-20 अध्यक्षपद, लस मैत्री उपक्रम आणि विविध मुक्त व्यापार करारांच्या माध्यमातून आपले स्थान अधिक मजबूत केल्याचे त्यांनी नमूद केले.
सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी कर्तव्य पथ, स्टॅच्यू ऑफ युनिटी, नवीन संसद भवन, राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि आदिवासी अभिमान दिन यांसारखे उपक्रम राबविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा), भाजप पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर तसेच विजय वानखेडे यांची उपस्थिती होती.


0 Comments