अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना च्या वतीने जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
प्रतिनिधी बार्शीटाकळी
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाच्या वतीने अकोला चे जिल्हाधिकारी निमा अरोरा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार शिक्षण अधिकारी प्राथमिक डॉ वैशालीताई ठग यांना अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे जिल्हाध्यक्ष शाहिद इकबाल खान सरफराज खान महिला जिल्हाध्यक्ष कमरुन्निसा मोहम्मद अन्वर यांचे उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले यावेळी सदर निवेदन मध्ये महाराष्ट्र शासनाचे समग्र शिक्षा अभियानांतर्गत वर्ग पहिली ते आठवी मधील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती बीपीएल मुले आणि सर्व मुली यांना गणवेशासठी निधी उपलब्ध करून दिल्या जाते शैक्षणिक सत्र २०२३ २०२४ करीता सुद्धा प्रति विद्यार्थी रु. ३००/- (तीन शे) प्रमाणे एका गणवेशाकरीता निधी उपलब्ध झालेला आहे परंतु ओबीसी व खुला प्रवर्गातील मुलांच्या गणवेशासाठी कोणताही निधी मिळत नाही,
ग्रामीण भागातील जि.प. शाळेत मोठ्या प्रमाणात मोल मजूरी करणारे लोकांचे मुले शिक्षण घेत आहे, त्यांच्या साठी हि बाब मन दुखवणारी असून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ओबीसी व खुल्या प्रवर्गातील सर्व मुलांच्या गणवेशासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावी, समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी च्या सर्व मुला मुलींना एक समान निधी उपलब्ध करून देण्यात यावी ओबीसी व खुल्या प्रवर्गातील सर्व मुलांना जि.प. सेस फंडातुन गणवेशासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावे याबाबतची मागणी निवेदन द्वारा करण्यात आली,
यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष राहुलला खान जिल्हा प्रवक्ता शेख राजू शेख चांद अकोला तालुका अध्येक्ष नावेद अंजुम मुर्तीजापुर तालुकाध्यक्ष मोहम्मद अलीम जिल्हा उपाध्यक्ष साजिद अन्सारी जिल्हा उपाध्यक्ष जुबेर दुर्राणी बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष रियाज अहमद सहा उल्ला खान समीउल्ला खान गुलाम फारूक गुलाम दस्तगीर शब्बीर अहमद शेख मन्ना अब्दुल रशीद अब्दुल बशीर वकार उल्ला खान प्रसिद्धी प्रमुख मोहम्मद अश्फाक आधी मोठ्या संख्येने अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
0 Comments