समाज क्रांती आघाडीची अकोला, एस पी कार्यालयाला धडक

समाज क्रांती आघाडीची अकोला, एस पी कार्यालयाला धडक
अकोला प्रतिनिधि,,
पुष्पेन्द्र कुमार केसरी लाल शर्मा व दिलीप कुमार देवीचं चौधरी. यांनी राजा मोतीरामजी शंभरकर यांची फसवणूक करून यांच्यावर खोटे आरोप करून रामदास पेठ पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हे दाखल केले. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी  व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा 1989 नुसार गुन्हे दाखल करावे.तसेच तत्कालीन रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर हिम्मतराव शेळके व  तपास अधिकारी सुरेश रामचंद्र महल्ले यांनी फिर्यादीशी संगतमत करून. तपासामध्ये योग्य तपास न करता फिर्यादीच्या तक्रारीवरून. अर्जदाराला कोणती संधी न देता तत्काळ अटक केली. असे करत असताना गैरअर्जदाराला नोटीस देणे अनिवार्य आहे. सुप्रीम कोर्टाचे असे निर्णय असतानाही त्याचा अवमान केला. तपासामध्ये कसूर केला. पदाचा दुरुपयोग केला. पावर ऑफ पटारणी नियम 1881 ,1A नुसार चौकशी करूनच राजा मोतीराम शंभरकर यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती परंतु तसे न करता फिर्यादीशी संगणमत करून रामदास पेठ पोलीस स्टेशनचे दोन्ही अधिकारी यांनी हेतू पुरस्कर चुकीची कारवाई केली व कैद केले त्यामुळे त्यांच्यावर  गुन्हे दाखल करावे यासाठी समाज क्रांती आघाडी चे अध्यक्ष हंसराज शेंडे, व पदाधिकारी बंडू वानखडे, अनिल ढोके, श्रावण रंगारी, अनिल तिडके, सुदामा शेंडे. विनोद इंगळे, भगवान खिराडे, देवलाल शिरसाठ, गणेश वानखडे, संजय इंगळे, धम्म ज्योती अबगड, यशपाल चांदेकर, शांताराम गवई, दिनेश गायकवाड, ऋतिक उके. इत्यादींच्या वतीने पोलीस अधीक्षक अकोला यांना निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments