दिनांक २९/०५/२०२३ रोजी दुपारी ३.३० वा. चे सुमारास सावंतवाडी येथील रहिवाशी हेमंत कृष्णा नाईक यांचे परिचयाचे विनायक धुरी रा. सावंतवाडी व प्रकाश लिंगायत रा. कोल्हापुर यांनी डबल सिरीजच्या नोटा सेटींग करून मुळ रक्कमेच्या दिडपट जास्त रक्कम देण्याचे अमिष दाखवुन सदर गुन्हयामध्ये फिर्यादी यांना पैसे दिडपट करून देतो असे अमिष दाखवुन भिवंडी येथे बोलावुन घेवुन ४ / ५ आरोपीत यांनी फिर्यादीचे १२,००,०००/- रू. फसवणुक करून घेवुन गेले होते. सदर बाबत कोनगांव पोलीस स्टेशन गु. रजि. नं. १८८ / २०२३ भा.दं.वि.सं.कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे दिनांक ०३/०६/२०२३ रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक-२ भिवंडीचे अधिकारी व अंमलदार करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या बातमी प्रमाणे संशयीत आरोपीत १) संतोष उर्फ बाळु मोहन गायकवाड वय ४० वर्ष, रा. पद्मानगर भिवंडी, २) मलीनाथ उर्फ मल्लेश श्रीमंत डिंगी वय ४५ वर्ष, रा. पद्मानगर भिवंडी, ३) रोहीत सतीश मोरे वय-२९ वर्ष, रा. पद्मानगर भिवंडी यांना चौकशी कामी ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी त्यांचे इतर साथीदार यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचे तपासात आरोपींनी फसवुक केलेल्या रक्कमेपैकी ४,००,०००/- रु. रोख हस्तगत करण्यात आलेले आहे. गुन्हयातील पाहिजे आरोपींचा शोध घेवून उर्वरित रक्कम हस्तगत करणेबाबत तपास चालु आहे..
सदर आरोपीत यांना मा. न्यायालयात हजर केले असता त्यांची दिनांक ०६/०६/२०२३ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनिरी. राजेंद्र चौधरी हे करीत आहे.
वरील कामगिरी ही वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन गायकवाड यांचे देखरेखीखाली सपोनिरी. विजय मोरे, सपोनि धनराज केदार, सपोनि प्रफुल्ल जाधव, पोउपनिरी. राजेंद्र चौधरी, पोहवा / २७६१ सुनिल साळुंखे, पोहवा / ८३८ साबीर शेख, पोहवा / १९१३ रंगनाथ पाटील, पोना / ६८८५ सचिन जाधव, पोकॉ / ७६८९ भावेश घरत, मपोहवा / ६८३३ माया डोंगरे, मपोहवा / ६७२० श्रेया खताळ यांनी केलेली आहे.
0 Comments