जळगाव.भारतीय कम्युनिस्ट पक्ष प्रणित लालबावटा शेतमजूर युनियन व आदिवासीं महासभाचे नेते कॉम्रेड अमृत महाजन यांचे नेतृत्वात कृष्णापुर नागलवाडी बोरजंटी कठोरा तालुका चोपडा व भोकर तालुका जळगाव येथील 50 भूमीहिन शेतमजूर दलित आदिवासी परिवारांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले याबाबतीत जमीन खेळणाऱ्या शेतकऱ्यांच्या 1961 पासून चे सातबारा उतारे डॉ पत्रके शेतसारा भरल्याच्या पावत्या या पुराव्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे
याबाबत सविस्तर असे की.चोपडा तालुक्यातील कृष्णापुर य बोरअजनती नागलवाडी अशा चौदा भूमीहीन शेतमजूर दलित आदिवासी यांचेसह 104लोकांनी 1955 सालापूर्वी वनखात्याला मदत केल्याने त्यांनी त्यांना गावालगत कसण्यासाठी दिली. त्यात 94 लोकांना त्यांच्या नावे जमिनी करण्यात आल्यात. उर्वरित 14 लोकांना मात्र जमिनी मिळाल्या नाहीत नावे केल्या नाहीत परंतु 1961 ते २०२२ पारपोलीत होत्या महसूल खात्याच्या रेकॉर्डवर सातबारा सदरी त्यांच्या पीक पेराच्या नोंदी,नमुना नंबर आठ, सारा भरल्याच्या पावत्या आहेत
या दरम्यानच्या काळात 1978 पूर्वी नंतर 1978 ते 1991 पर्यंतची सरकारी जंगल गायरान वरील जमिनी नावावर करण्याचे कायदे करण्यात आले परंतु तांत्रिक चुकीमुळे कृष्णापुर सह शेजारील नागलवाडी गावातील एकूण 14 लोकांचे नावे जमिनी झालेल्या नाहीत. त्या जमिनी वरील तांबे काढून देण्यासाठी मुंबई हायकोर्टाने 22 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या निकालाचा संदर्भ घेऊन त्यांना निष्कासन करण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहे जळगाव तहसीलदार यांनी तलाठी यांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र फॉरवर्ड करताना जमिनी नावावर करण्याचा कायद्यानुसार काही जमिनी राहिल्या असतील तर माहिती द्यावी अशी टीप दिलेली आहे व ती बरोबर आहे. तरी चोपडा तहसीलदारांनी या लोकांना जमिनीवरून निष्कासन करणाऱ्या नोटीसा मागे घ्याव्यात अशी मागणी घेऊन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज रोजी सकाळी 11 ते तीन वाजता दुपारी तीन वाजता बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
या शेतकऱ्यांना कृष्णापुर ग्रामस्थांनी पाठिंबा दिला असून ग्रामपंचायतने नाहरकत दिलेली आहे तसेच भोकर तालुका जळगाव येथील तापी नदीकाठी जमीन पाणबुड असून पावसाळ्यात कामात येतच नाही अशा जमिनीवरून सुद्धा शेतकऱ्यांना निष्कासन करण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत तसेच कठोरा तालुका चोपडा येथील 24 अल्पभूधारकांना फक्त वीस गुंठे ते 40 गुंठे एवढ्याच जमिनीचे मालक करून उर्वरित जमीन अतिक्रमित ठरवून त्यांनाही निष्कासन करण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत कठोरा व जळगाव तालुक्यातील लोकही आंदोलनात सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात येऊन आंदोलनाची दखल न घेतल्यास विभागीय आयुक्त शासन ते सर्वोच्च न्यायालय पातळीवर तसेच सनदशीर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी निवेदनात दिला आहे.भारतीय कम्युनिस्ट पक्ष प्रणित लालबावटा शेतमजूर युनियन व आदिवासीं महासभा चे कॉम्रेड अमृत महाजन यांचा नेतृत्वात भूमीहिन शेतमजूर दलित आदिवासी यांनी परिवारांतील लोकांसह हे आंदोलन केले त्यावेळी माजी नगरसेवक काँ सुरेश शिरसाठ, व शेतमजूर युनियनचे नेते विनोद आढळके तसेच कौतिक कोळी गोकुल कोळी भुऱ्या बारेला ,दयाराम देवरे, नामदेव शिरसाट, आशाबाई पाटील, सुमनबाई कोळी, अंबादास कोळी, श्रावण भिल ,धोंडू सपकाळे, अशोक पाटील, भीमराव कोळी ,आदींनी हिरीरीने भाग घेतला
0 Comments