के‌. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा.


जळगाव (अकिल खान)

 येथील अंजुमने खिदमते खल्क संचालित के‌. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व डॉ. शाहीन काझी ज्युनियर कॉलेजमध्ये संस्था अध्यक्ष डॉ. अल्हाज अमानुल्लाह शाह यांच्या अध्यक्षतेखाली शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी  उपाध्यक्ष अल्हाज मजीद सेठ ज़केरिया , सदस्य ज़ाहीद शाह व मुख्याध्यापिका तन्वीर जहाँ शेख उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अल्हाज अमानुल्लाह शाह यांनी उपस्थित विद्यार्थिनीं ना शिक्षण घेणे व आपल्या घर व परिसरात शिक्षणासंबंधी जागृती करणे समाज हिताच्या दृष्टीने का महत्वाचे आहे हे सांगितले तसेच यावेळी इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थिनींना महाराष्ट्र शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या मोफत शालेय पाठपुस्तका हि वाटप करण्यात आली व विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका शकीला शेख, जमिला खान, शिक्षक मुश्ताक भिस्ती व इमरान खान यांनी परिश्रम घेतले  सूत्रसंचालन मझहरोद्दीन शेख यांनी केले आभार प्रदर्शन ज़ाकीर शाह यांनी मानले۔


Post a Comment

0 Comments