१) जळगाव शहरातील एमआयडीसी पो.स्टे. हद्दीतील स्थानबध्द इसम किरण शंकर खर्चे वय ३० रा. खूबचंद साहित्या नगर, सुप्रिम कॉलनी, जळगाव ता. जि. जळगाव याचे विरुध्द खालील प्रमाणे १७ गुन्हे दाखल आहेत.
सदर स्थानबंद इसमाचा महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम १९८१ (महाराष्ट्र राज्य कायदा क्रमांक ५५ सन १९८१) सुधारणा अधिनियम २०१५ अन्वये धोकादायक व्यक्ती, या संज्ञेत प्रस्ताव हा जळगाव शहर पो.स्टे. चे पो. निरी. जयपाल हिरे यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे दि. १४/०५/२०२३ रोजी सादर केला. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता.
त्यानुसार दि. ०३/०६/२०२३ रोजी मा. श्री. अमन मित्तल, जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेश क्र.दंडप्र/ कावि/ एमपीडीए / ५३/२०२३ अन्वये स्थानबध्द आदेश पारीत केल्याने सदर स्थानबंद इसमा यास एमआयडीसी पो.स्टे. पो. निरी. जयपाल हिरे, पोउनि, दत्तात्रय पोटे, सफी/अतुल रघुनाथ वंजारी, पोना/सचिन किरण पाटील, पोना/ योगेश देविदास बारी अशांनी त्यास दि.०६/०६/२०२३ रोजी मिरा भाईंदर जि.ठाणे येथून ताब्यात घेवून येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे दाखल केले आहे.
वरील एम. पी.डी.ए. प्रस्ताव हे मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरी.श्री. किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व त्यांचे अधिनस्त सफी/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ / सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ / जयंत भानुदास चौधरी, पोकॉ/ ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे.
0 Comments