भुसावळ येथे दावत इस्लामी हिंदचे जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न‌.

भुसावळ येथे दावत इस्लामी हिंदचे जिल्हास्तरीय हज                         प्रशिक्षण  यशस्वीपणे संपन्न‌.

*भुसावळ येथे दावत इस्लामी हिंदचे जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण  यशस्वीपणे संपन्न‌.*
जळगाव (अकिल खान ) : दावते इस्लामी हिंदच्या हज व उमरा विभागांतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही  ज्युनियर रेल्वे इन्स्टिट्यूट  भुसावळ येथे हज साठी  जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले.  प्रशिक्षक फारुक चिश्ती साहेब धुळे  यांनी हज यात्रेकरूंना मार्गदर्शन करताना  अहेराम घालण्याच्या पद्धती, तवाफ, सई ची पद्धत, परिक्रमा आणि तकसीर तसेच हज दरम्यान येणाऱ्या संभाव्य समस्यांवर उपाय आणि त्यांच्या व्यावहारिक पद्धती बद्दल माहिती दिली तर हाजी सलीम अत्तारी राष्ट्रीय सदस्य दावत-ए-इस्लामी हिंद यांनी मदिना येथील शिष्टाचार आणि पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या मजारला भेट देण्याची पद्धत सोबत संघटने बद्दल माहिती दिली. दावते इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष श्री जुबेर अत्तारी यांनी नमाज आणि प्रार्थना करण्याची पद्धत शिकवली.  या सभेला संपूर्ण
 जळगाव जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  शेवटी मौलाना इलियास कादरी यांनी लिहिलेले रफिक उल-हरमैन हि पुस्तक
 हज यात्रेत अतिशय उपयुक्त आहे म्हणून उपस्थित सर्व भाविकांना भेट म्हणून देण्यात आली‌ कार्यक्रमा च्या शेवटी  देशाची प्रगती, अखंडता एकता आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी शाकीर कादरी, अजहर कादरी, फरीद शेख, सईद अत्तारी युसूफ बरकती, शोएब अत्तारी, आसिफ अत्तारी, ईमरान अत्तारी रफीक रोशन कादरी यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments