ठाणा गावातील मजिद मध्ये चोरी झाली असता आरोपी मुद्देमाल ताब्यात !


फर्दापूर प्रतिनिधि : शैख़ हक्कानी
 
मागील महिन्यात ठाणा गावातील मजिद मध्ये एका अज्ञात चोरांनी घड्याळ आँटोमँटिक नमाज टाईमिग इंडिकेटर अब्दूलला सलात कंपनीची तेवीस हजार रुपये  किंमतीची व ड्राय व्हँय्कूम किलनर सहा हजार रुपये किंमतीची असे एकूण एकोणतीस हजार रुपये किंमतीची साहित्य अज्ञात चोरांनी मजीद मध्ये प्रवेश करून चोरुन नेले असता या ठाणा गावातील जावाई यांनी येथे राहत असताना हा मुद्देमाल चोरी केली होती तरी हा आरोपी शेख जाकिर शेख आशक हुसेन वय 33 रा धावडा ता भोकरदन जि जालना याला राहत्या घरी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून आरोपी यास पोलिस कोठडी देण्यात आली असून याकडे अजून गुन्हे उघडकीस येते की काय यामुळे आरोपी यास कोठडी सुनावली आहे

यावेळी तपास कामी फर्दापूर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लोखंडे, प्रकाश कोळी, मकसुद तडवी महिला पोलिस कल्पना चाथे कविता चाथे हे तपास हजर होते.


Post a Comment

0 Comments