सोयगाव तालुक्यतील दत्तवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी आर. जी. गुंडिले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत कृषी क्षेत्राची भावी दिशा व जमीन सुपीकता जागृती दिवस साजरा

सोयगाव तालुक्यतील दत्तवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी आर. जी. गुंडिले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत कृषी क्षेत्राची भावी दिशा व जमीन सुपीकता जागृती दिवस साजरा,
फर्दापूर .प्रतिनिधि,शेख हक्कानी 

फर्दापूर . सोयगाव तालुक्यातील दत्तवाडी येथे सोयगाव कृषी विभागाच्या वतीने मंडळ अधिकारी आर. जी. गुंडिले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत कृषी क्षेत्राची भावी दिशा व जमीन सुपीकता जागृती दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रकांचे वाटप करून जमिनीतील अन्नद्रव्याच्या उपलब्धतेनुसार रासायनिक खतांचा डोस व सूक्ष्म अन्नद्रव्य जैविक खते यांचा समतोल साधून उत्पादन कसे वाढवता येईल तसेच जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात आढळून आल्यामुळे भविष्यात जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कसे वाढवता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन मंडळ अधिकारी आर. जी. गुंडिले यांनी केले.यावेळी कृषी पर्यवेक्षक समाधान चौधरी यांनी खरीप हंगाम पिक विमा योजना व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना बाबत सखोल अशे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमास कृषी सहाय्यक बी.आर.चौरे, संतोष गवारे, दादाराव लांडगे, बाबुराव लांडगे,गावाचे सरपंच , ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments