रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
जलगाँव प्रतिनिधि,,,,,,
दिनांक 19/11/2022 रोजी फिर्यादी नामे मोहनलाल देवजी पटेल यांचा मुलगा नामे भावेश पटेल यांच्या मोबाईल क्रमांक 9860940405 यावर 7738771861 करण शंका नाव सांगणाऱ्या इसमाने त्याची स्वत:ची ISO TOPS INDIA METAL TRADERS नावाची कंपनी असुन आपणाला बांधकामास लागणारे स्टील मटेरीयल पाठवितो असे सांगुन त्याची बनावट वेबसाईट www.isotopsindiametal.com तयार करुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादी यांना व्हॉटसअॅप व्दारे बनावट TAX INVOICE व बनावट E-WAY BILL पाठवुन, 7738771861 करण रांका व 9519560878 ट्रकचालक राकेश शर्मा असे नाव सांगणा-या अज्ञात मोबाईल क्रमांक धारक यांनी ऑनलाईन वेळोवेळी एकुन- 16,27,800 /- रुपये त्यांच्या स्वता: च्या आर्थिक फायदयासाठी घेवुन फिर्यादी यांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली म्हणुन सायबर पोलीस स्टेशन, जळगांव येथे भाग-5 गुरनं- 01/2023 भादंवि कलम 409, 420, 466, 467,34 सह आय. टी. अॅक्ट-66(सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीताची काम करण्याची पद्धत- बांधकामास लागणारे स्टील मटेरीअल पाठवितो असे सांगुन बनावट कंपनीची बनावट वेबसाईट तयार करुन त्याद्वारे स्वत:ची कंपनी आहे असे सांगुन बनावट कागदपत्र पाठवून मटेरीअल ट्रकने पाठवितो असे सांगुन त्याद्वारे लोकांचा विश्वास संपादन करून रक्कम भरण्यात लावणे व त्यानंतर कुठलेही मटेरीअल न पाठविणे.
अटक आरोपी सदर गुन्ह्यात या आरोपीतांना वसई येथून ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयात या अगोदर दोन आरोपी अटक असुन या गुन्हयातील खालील मुख्यसुत्रधार यांना अटक करण्यात आलेली आहे.
1) महेद्र गणेशभाई पालीवाल वय- 23 रा.03 पांजरा पोळ, जैन भोजनालय जवळ, रतन पोल, अहमदाबाद-
गुजराथ 2) धर्मेश अरविंद राठोड, वय-39, रा.404, ए विंग, ऑरेंज हाईट, यशवंत नगर, फनफिस्टा रोड, नालासोपारा (पश्चिम), जि. पालघर.
सदर गुन्ह्यात मा. पोलीस अधिक्षक सो, जळगांव, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. जळगाव व चाळीसगांव यांचे मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक/ अशोक उतेकर यांनी पोहेकॉ / 2616 वसंत बेलदार सोबत पोकों/ 1829 श्रीकांत चव्हाण, पोकॉ/3259 ललित नारखेडे व पोकों/ 1675 पंकज वराडे असे तपास पथक तयार करुन आरोपीतास तांत्रिक विष्लशनाच्या आधारावर वसई विरार मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.
0 Comments