मिल्लत हायस्कूल एकूण 91.44% निकालजळगाव: इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालानुसार,

मिल्लत हायस्कूल एकूण 91.44% निकाल
जळगाव: इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालानुसार, 
मुख्य संपदक जलगांव         उप संपादक अकोला
रशीद शेख बागबान             इरफ़ान अहमद शेख
  8484819485                 9766221455  

प्रतिनिधि, मेहरूण,जलगांव,,,

मिल्लत हायस्कूल, मेहरूण, जळगावचा एकूण निकाल 91.44% लागला आहे. यावर्षी एकूण 187 विद्यार्थी परीक्षेला बसले असून 171 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शेख झुबिया नाज जाहिद (89.20%), हमना कौसर शेख साजिद (87.20%), खान अशना इफ्फत शरीफ (87%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. तर सिद्दीकी सिराजुद्दीन गुलाम हुसेन आणि अलफराह नाज शकील अहमद यांनी समान गुण (86.40%) मिळवून चौथा क्रमांक मिळविला. तसेच ईशरत नाज रशीद खान (83.60%) यांनी पाचवा क्रमांक पटकावला.
 निकालानुसार विद्यालयात डिस्टिंक्शनमध्ये 24 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 80 विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणीत 61 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मिल्लत एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष मुहम्मद रफिक शाह सर, उपाध्यक्ष डॉ. इक्बाल शाह सर, सचिव शेख फरीद सर, मुख्याध्यापिका अफिफा शाहीन शेख, पर्यवेक्षक शेख ताजुद्दीन सर व मिल्लत हायस्कूलच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी प्रार्थना केली आहे. 


Post a Comment

0 Comments