जमाते इस्लामी हिंद बार्शीटाकळी तर्फे पर्यावरण सप्ताह
मुख्य संपादक जलगांव उपसंपादक अकोला
रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
प्रतिनिधि बार्सिटाकली,,,,,
बार्शीटाकळी ५ जून दर वर्ष प्रमाणे या वर्ष ही जमात ए इस्लामी हिंद राज्यात पर्यावरण सप्ताह साजरा करणार आहे. हे गोष्ट लक्षात घेऊन जमात ए इस्लामी हिंद महिला गट बार्शीटाकीच्या वतीने नगर अध्यक्ष बार्शीटाकली यांना निवेदन सादर केला.
ज्याचे शिर्षक
संतुलित पर्यावरणासाठी संतुलित विचार असे आहे. हा सप्ताह दिनांक ०५ जून ते १२ जून पावेतो साजरा करण्यात येईल. यात विविध कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे. या साठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. आपल्याला माहीतच आहे पावसाळा येऊ घातलेला आहे, त्या अनुषंगाने शहरात खालील कामे करण्याची आवश्यकता आहे.
१) तुंबलेल्या नाल्या साफ करणे.
२) शहरात जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढिग साफ करणे. (३) प्लास्टिक हटवून त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे. (४) शहरात डासांची पुनरुत्पत्ती वातावरण बदलामुळे सुरू झालेली आहे. येत्या काळात ओल्या वातावरणात डास अधिक प्रमाणात उत्पन्न होतील. त्यामुळे डेंगू सारखे आजार बळावण्या ची शक्यता नाकारता येत नाही.
तरी फागिंग मशीन द्वारे फवारणी करण्यास सुरुवात करावी.
आम्हाला आशा आहेत की आपण वरील कामे आपल्या कर्मचाऱ्यां मार्फत करून घेऊन सहकार्य कराल. सदर काम पूर्ण करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष साहेब बार्शीटाकळी यांनी दिले. यावेळी रुबीना कौसर अध्यक्षा जमात ए इस्लामी हिंद महिला गट बार्शीटाकली, सफिया खान, सालेहा हुसैन, आमीना नूर, तस्लीमा बी, रजिया बानो, तरन्नुम परवीन, तुबा माहिन, जेबा तंजिला, सायमा कौसर, गौसिया परवीन,नगमा परवीन, अफसाना परवीन, अजीमा बानो निवेदन देताना हजर होते.
0 Comments