एम.आय.डी.सी. पोस्टेचे गुन्हे शोध पथक कडुन चोरीची 05 दुचाकी करण्यात आली जप्त ;

एम आय डी सी पोस्टेला सिसिटीएनएस नं. 260/2023 भादवि कलम 379 प्रमाणे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दिनांक 30.04.2023 रोजी 11.22 वाजता दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हांतील फिर्यादी नामे अनिकेत अशोक पवार वय 29, रा. रायसोनीनगर, अयोध्यानगर जळगाव यांची दिनांक 26.04.2023 रोजी रात्री 21.30 से 21.45 वाजेचा दरम्यान , अॅक्टीवा कंपनीची मो सा क्र एम एच 19 डी एल 4235 ही चोरी गेलेली होती.
सदर गुन्हांत मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सो., यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून मोटारसायकल गॅरेजवर काम करणारे आरोपी क्र 01] नंदकिशोर उर्फ बाळा सुभाष पाटील वय 21 वर्ष 2J हर्षल उर्फ दादु सुभाष देवरे वय-21 दोघे रा.सारवखेडे ता. पारोळा जि जळगाव यांना दिनांक 06.06.2023 रोजी 21.14 वाजता ताब्यात घेण्यात आले होते. तसेच आरोप क 03 संदीप राजेन्द्र पाटील वय 21 रा. करमाळा ता पारोळा जि जळगाव यास दिनांक 08.06.2023 रोजी 13.12 वाजता ताब्यात घेण्यात आले होते.

सदर गुन्हांत तिन्ही आरोपी यांना अटक करुन पोलीस कस्टडी दरम्यान खालील प्रमाणे वर्णनाची व किंमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.


वरील तक्ता मधील अ.क्र. 1 मधील वर्णनाची व किंमतीची मुळ गुन्हांतील मोटारसायकल असुन अक्र.02 मधील वर्णनाची व किंमतीची ही मोटारसायकल नाशिक इंद्रीरानगर पोस्टे सिसिटीएनएस नं. 133/2023 भादवि कलम 379 प्रमाणे मधील चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच अ क्र.03 मधील वर्णनाची व किंमतीची मोटारसायकल ही पारोळा पोस्टे सिसिटीएनएस नं. 258/2022 भादवि कलम 379 प्रमाणे मधील मोटारसायकल बाबत तपासात निष्पन्न झाले आहे. अ.क्र.04 मधील वर्णनाची मोटारसायकल ही भडगाव येथुन व अ.क्र.05 मधील वर्णनाची व किंमतीची यामाहा कपंनीची मोटारसायकल भडगाव पाचोरा रस्तावरुन चोरी केल्याची तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री एम राजकुमार सो., जळगाव जिल्हा व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी सो., तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित सो., जळगाव भाग जळगाव व मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हीरे सो., यांचे मार्गदर्शनाखाली पोउप निरी आनंदसिंग पाटील, सफी अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, जितेंन्द्र राजपुत, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पोकों छगन तायडे, ईश्वर भालेराव पोहेकॉचालक इम्हीयाज खान अशांनी केली आहे. गुन्हांचा तपास पोलीस निरीक्षक श्री जयपाल हीरे सो., यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गणेश शिरसाळे करीत आहेत.



Post a Comment

0 Comments