सोयगांव तालुका (प्रतिनिधि )शेख हक्कानी
दिनांक 17 जुन शनिवार
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे चक्रधर स्वामी मंदिरावर आज दिनांक 17 जून 2023 रोजी सिल्लोड पोलीस उप अधीक्षक दिनेश कोल्हे व फर्दापुर सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली फर्दापूर व सावळदबारा परिसरात सर्व बारा ते अठरा गावांना ,खोट्या आफवा फसविऱ्यावर व सोशल मिडियाद्वारे वादग्रस्त पोस्ट दोन समाजात तेढ निर्माण होतील असे फोटो व्हिडिओ पोस्ट व्हायरल करणे हा गुन्हा आहे ते आढळल्यास संबंधितावर ग्रुप ॲडमिनवर कारवाई केली जाईल सिल्लोड सोयगाव पोलीस उप अधीक्षक दिनेश कोल्हे व फर्दापूर पोलिस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक भरत मोरे कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असे स्टेटस ठेव नये मोबाईल एक प्रकारचे शस्त्र आहे हे शस्त्र योग्य पद् .अन्य जिल्ह्यातील एका अप्रिय घटनेच्या अनुषंगाने काही समाज विघातक शक्ती सोशल मिडीयाचा वापर करून असत्य, तर्कहीन आणि सामाजिक शांतता भंग करणारे संदेश प्रसारित करत आहेत. परंतु, अश्या बातम्यांमध्ये कसलेही तथ्य नसून नागरिकांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन सिल्लोड उप अधीक्षक दिनेश कोल्हे व फर्दापुर सह पोलीस निरीक्षक
भरत मोरे यांनी केले या वेळी सावळत बारा ग्रामपंचायत च्या वतीने सरपंचपती शिवाप्पा चोपडे व उपसरपंच मोहम्मद आरिफ यांच्यातर्फे सिल्लोड पोलीस उप अधीक्षक व फरदापुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी गावातील व परिसरातील आजी माझी सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील शिक्षक वर्ग पत्रकार बंधू व फरदापुर सिल्लोड चे पोलीस कर्मचारी तरुण मित्र मंडळ उपस्थित होत
0 Comments