ता.जामनेर जिल्हा जळगांव येथे राष्ट्रवादी महिला तर्फे कॅन्डल मार्च आंदोलन घेण्यात आले संसद भवन दिल्ली येथे नरेंद्र मोदी हे उद्घाटनाला आले असता कुस्तीगीर महिला आंदोलन शांततेत करत होत्या त्यांना नरेंद्र मोदी साहेबांना भेटायचे होते भाजपचे खासदार ब्रिजमोहन शरण सिंह हे महिलांवर अत्याचार आणि लैंगिक शोषण करत असल्यामुळे त्या कुस्तीगीर महिलांनी त्यांची चौकशी व्हावी त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा या संदर्भात 25 दिवसापासून आंदोलन करत होते पण संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी त्यांना पोलिसांनी अडवले भेटू दिले नाही आणि अमानुषपणे त्यांना ओढतांड करत लाठी ने हल्ला करत त्यांना गाडीत डांबण्यात आले आणि त्यांचा तंबू सुद्धा उघडण्यात आला भाजपचे खासदार असल्यामुळे कोणतीच कारवाई त्यांच्यावर होत नाही ज्या महिला आपल्या भारताला गोल्ड मेडल मिळवून देण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे अशा महिला रत्नांचा कायमच भाजप अपमान करत आलेला आहे बेटी बचाव बेटी पढाव असा नारा देणारे नरेंद्र मोदी आज महिलांचे काय ऐकत नाही आज वारंवार महिलांवर अन्यायाने अत्याचार होत आहे याबद्दल कोणी काही कारवाई करायला तयार नाही हेच का ते अच्छे दिन या विषयावर आज आम्ही जामनेर येथे कॅन्डल मार्च आणि कुस्तीगीर महिलांच्या समर्थनार्थ आंदोलन घेतले राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन घेण्यात आले
आंदोलनासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष फौजियाताई खान राज्यनिरीक्षक आशाताई मिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम घेण्यात आला जय राष्ट्रवादी
0 Comments