( इरफ़ान अहमद शेख )
अकोला संत नरहरी सोनार केवळ शिव भक्त होता त्यामुळे इतर देवांचे दर्शन घ्यायला कधीच तयार होत नव्हता मात्र नरहरी सोनाराच्या डोळ्यांना पट्टी बांधल्यानंतर शिव दर्शन होत होते तर उघड्या डोळ्यांनी पांडुरंग दिसत होते असे 2 ते वेळा घडल्यानंतर डोळे बंद असतांनाच एकाच वेळी भगवान शिव शंकर आणि पांडूरंग विठ्ठल दर्शन झाल्याचा साक्षात्कार झाला असल्याची पांडुरंगाच्या कमरेच्या सोन्याचा पट्टा कधी लहान तर कधी मोठा होत असल्याची कथा सांगत पांडुरंग हा शिव आहे आणि शिव हेच पांडुरंग असल्याचे उदाहरण देऊन कथेला प्रारंभ केला अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर येथे आज मे 5 मे पासून 11 मे पर्यंत श्री स्वामी समर्थ शिव महापुराण आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित कथावाचक पं प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून सुरू आहे आज सकाळी 8 वाजता म्हैसपूर येथील महापुरान आयोजक रुपेश चौरसिया आणि विजय दुबे परिवाराने पूजा करून शिव महा पुराण कथेला शिव शंकराच्या जयकाराने प्रारंभ करण्यात आला यावेळी लाखोंच्या संख्येने महिला भविकांसह भाविक उपस्थित होते याच भविकांच्या उपस्थिती मध्ये अकोला जिल्ह्यातील निवासी बाल कथावचक श्रीकृष्ण महाराज दुबे यांच्या वाणीतून दुपारी साडे तीन ते साडे सहा यावेळेत श्रीमत भागवत कथा प्रारंभ झाली आहे
आज अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा,,निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसिलदार सुनील पाटील,सह जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी ठाण मांडून होते कथेवर आणि तेथील परिस्थिती वर लक्ष ठेवून होते.
0 Comments