फरदापुर प्रतिनिधि : शेख हक्कानी रिपोर्ट
फर्दापूर प्रतिनिधी।बारावीच्या उत्तरपत्रिकेतील अक्षरांतील बदल असल्याची माहिती लपवल्याप्रकरणी दोन जणांविरोधात फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही आरोपी फरार आहेत.
बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या ३९४ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखे हस्ताक्षर असल्याच्या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या उत्तरपत्रिका फर्दापूर परिसरातील शिक्षकांकडे तपासण्यास पाठवल्या होत्या. त्यामुळे याप्रकरणी फर्दापूर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड, हिंगोली जिल्ह्यांतील भौतिकशास्त्र विषयाच्या ३९४ उत्तरपत्रिकांची तपासणी ही फर्दापूर परिसरातील शिक्षकांकडे होती. त्यामुळे हा प्रकार त्याच परिसरात झालेला असावा, असा निष्कर्ष बोर्डाने काढला आहे.
दरम्यान मोजे पिंपळा व धनवट ता सोयगाव येथील राजकुमार कनिष्ठ महाविद्यालय फर्दापूर येथे आरोपी राहुल भगवानसिंग उसारे (रा. पिंपळा, ता. सोयगाव) व मनीषा भागवत शिंदे (रा. धनवट, ता. सोयगाव) यांनी संगनमत करून
इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्राच्या विषयाच्या उत्तरपत्रिकेतील अक्षरातील बदल असल्याचे माहीत असतानासुद्धा त्यांनी ती माहिती महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांना दिली नाही. सदर माहिती लपवून महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळ यांची फसवणूक, ठकवणूक करून बनावट दस्तऐवजाची माहिती जाणीवपूर्वक लपवली म्हणून सोयगावचे गटशिक्षणाधिकारी रंगनाथ रेवबा आढाव यांनी तक्रार दिली. त्यानुसार राहुल उसारे, मनीषा भागवत शिंदेविरोधात गुन्हा दाखल झाला.पुढील तपास फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
0 Comments