तत्कालीन मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी केलेल्या बनावट स्वाक्षरी प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सी. आय. डी.) कडे सुपूर्द
रशीद शेख बागबान इरफ़ान अहमद शेख
8484819485 9766221455
प्रतिनिधि, कारंजा (लाड़)
जिल्हाधिकाऱ्यांचे तक्रारकर्ता सलीम तेली यांच्या मुळ स्वाक्षरी नमुने सादर करण्याचे मुख्याधिकाऱ्यांना आदेश,
मुख्याधिकारी न. प. कारंजा व जिल्हाधिकारी वाशिम मार्फत तक्रारकर्ता सलीम तेली यांच्या मुळ स्वाक्षरी चे नमूने राज्य गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर यांना सादर,
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुढील तपास व कारवाई कडे नागरिकांचे लक्ष
गुन्हे अन्वेषण विभागावर पुर्ण विश्वास असून त्यांच्या तपासात दूध का दूध समोर येईल अशी तक्रारकर्ता यांची तक्रार,
मा. लोक आयुक्त यांच्या कडून होत असलेल्या चौकशी व होणाऱ्या कार्यवाहीच्या भितीपोटी दादाराव डोल्हारकर यांनी खोटी स्वाक्षरी करून तक्रार मागे घेत असल्याचे बनावट पत्र बनवून खोटे व बनावट अहवाल सादर केल्याप्रकरणी तक्रारकर्ता यांनी खोटी स्वाक्षरी केल्याची लेखी फिर्याद दिल्यानंतर दादाराव डोल्हारकर यांनी बनावट व खोटे अहवाल शासनास सादर केल्याने शासनाकडूनच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्याकरिता मा. आयुक्त व मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते, मा. जिल्हाधिकारी यांनी सलीम तेली यांच्या निवेदनाची त्वरीत दखल घेत मुख्याधिकारी न. प. कारंजा यांना दिनांक २८/२/२०२३ ला लेखी पत्र देऊन विशेष दूत मार्फत अहवाल व मुळ स्वाक्षरी नमुने सादर करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार सदर स्वाक्षऱ्या पडताळणी साठी फाॅरेंसिक विभागाकडे पाठविण्यात आले होते परंतू फाॅरेंसिक विभागाकडे हस्ताक्षर पडताळणी होत नसल्याचे अहवाल आल्यानंतर तक्रारकर्ता सलीम तेली यांनी स्वाक्षरी पडताळणीसाठी शासकीय दस्तावेज परिक्षक, हस्ताक्षर व छायाचित्रण विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर यांच्या कडे प्रकरण पाठविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यानुसार सदर प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे, गुन्हे अन्वेषण विभागावर आपले पुर्ण विश्वास असून त्यांच्या तपासणी मध्ये दुध का दुध होऊन सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया तक्रारकर्ता सलीम तेली यांनी दिली आहे
0 Comments