गुन्हे शाखा, वागळे युनिट ५, ठाणे यांनी ३ इसमांना २४० ग्रॅम वजनाचा एम. डी. पावडर (मेफेड्रोन) या अमंली पदार्थ मोठ्या साठ्यासह केले जेरबंद "

गुन्हे शाखा, वागळे युनिट ५, ठाणे यांनी ३ इसमांना २४० ग्रॅम वजनाचा एम. डी. पावडर (मेफेड्रोन) या अमंली पदार्थ मोठ्या साठ्यासह केले जेरबंद
Sach crime news
मुख्य संपादक प्रशिक्षक
8484819485
----------------------.                          Sach crime news
                                                   समीर शाह की रिपोर्ट
                                                    ---------------------------
गुन्हे शाखा, वागळे युनिट ५, ठाणे यांनी ३ इसमांना २४० ग्रॅम वजनाचा एम. डी. पावडर (मेफेड्रोन) या अमंली पदार्थ मोठ्या साठ्यासह केले जेरबंद "
दि. २८ अप्रैल २०२३ रोजी गुन्हे शाखा वागळे युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, दि. २९ अप्रैल २०२३ रोजी रोड न. २२ सर्कलजवळ किसाननगर कडे जाणारे रोडवर, वागळे इस्टेट ठाणे येथे दोन इसम त्यांचेकडील दोन मोटार सायकलवरून एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ त्यांचे ग्राहकांना विक्री करण्यासाठी येणार आहेत" अशी गोपनीय माहिती मिळाल्याने मा.वरिष्ठांच्या मागदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे युनिट ५, ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रोड न. २२ सर्कलजवळ वागळे इस्टेट ठाणे येथे सापळा लावुन आरोपी ला पकड़ले आरोपीचे नाव १) अमर अशोक तुसामकर वय २९ वर्षे, रा. साठेनगर वाल्मिकीपाडा, वागळे इस्टेट ठाणे २) मोहसिन शफिक शेख, वय- ३४ वर्षे, रा. किसाननगर नं. २, वागळे इस्टेट ठाणे, ३) निहाजुल सत्तार सय्यद, वय ३४ वर्षे, रा. किसाननगर नं. ३, वागळे इस्टेट ठाणे यांना ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एकुण ९,६०,०००/- रुपये किंमतीचा एकुण २४० ग्रॅम वजनाचा एम. डी. पावडर (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ तसेच रोख रक्कम, मोबाईल फोन, दोन मोटार सायकल असा एकूण १४,०७,५००/- रू किंमतीचा मुद्देमाल जपत केला आहे.आणी त्यांचे विरुध्द श्रीनगर पोलीस स्टेशन ठाणे येथे गु.र.नं ॥ १११/२०२३ एन. डी. पी. एस. अक्ट, १९८५ चे कलम ८(क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांची दि. ०२ मई २०२३ रोजी पोवेतो पोलीस कस्टडी घेण्यात आली असुन नमुद आरोपीत हे वागळे इस्टेट किसाननगर परिसरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा धंदा करीत असल्याची माहीती समोर येत असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास वागळे युनिट ५ चे स.पो. निरी भुषण एच. शिंदे करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. जयजित सिंग, मा. पोलीस सह आयुक्त श्री. दत्तात्रय कराळे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. शिवराज पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री. निलेश सोनवणे, शोध १, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे युनिट-५, ठाणे चे वरिष्ठ पो. निरी. विकास घोडके, सहा. पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, पो.उप.निरी, शिवाजी कानडे, स. पो.उप निरी. सुनिल अहिरे, पो.हवा, रोहीदास रावते, पो. हवा. सुनिल रावते, पो. हवा. अजय साबळे, पो.हवा. सुनिल निकम, पो. हवा विजय काटकर, पो.हवा सुशांत पालांडे, पो. हवा संदिप शिंदे, पो.हवा. जगदिश न्हावळदे, म.पो. हवा. मिनाक्षी मोहीते, म. पो. हवा. सुनिता गिते, पो.ना. उत्तम शेळके, पो.ना. तेजस ठाणेकर, चालक पो. कॉ. यश यादव या पथकाने केली आहे.हे सगळ कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वागळे युनिट ५, ठाणे यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments