शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्ष पथकाकडून अटक आरोपीकडुन ०१ जबरी चैन चोरी व मोटार सायकल चोरीचे ०२ गुन्हे उघड

शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्ष पथकाकडून अटक आरोपीकडुन ०१ जबरी चैन चोरी व मोटार सायकल चोरीचे ०२ गुन्हे उघड
दिनांक : ०४/०५/२०२३
अटट्ल सोनसाखळी चोरास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्ष पथकाकडून अटक आरोपीकडुन ०१ जबरी चैन चोरी व मोटार सायकल चोरीचे ०२ गुन्हे उघड
मागील काही दिवसामध्ये ठाणे शहरात सोनसाखळी आणि मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. त्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्तांनी बैठकीमध्ये त्याबाबत तपास करण्याचे आदेश दिले. होते. त्याप्रमाणे ठाणे गुन्हे शाखाकडील मालमत्ता गुन्हे कक्ष पथकाकडून तपास चालू करून बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सदर आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली होती.
मालमत्ता गुन्हे कक्ष पथकाचे पोहवा / राजेंद्र घोलप यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आणि अत्यंत कौशल्याने तपास करून आरोपी नामे मुसा रजा सय्यद, वय ३३ वर्षे, राह. आंबिवली ता. कल्याण, जि. ठाणे यास सोनसाखळी व मोटार सायकलसह ताब्यात घेऊन कार्यालयात आणून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता ठाणेनगर पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ५३ / २०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे मधील जबरीने खेचुन घेतलेली चैन व वाशिंद पो.स्टे. ठाणे ग्रामीण गुन्हा रजि. नं. ९० / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे मधील पल्सर मोटार सायकल आणि विलेपार्ले पो.स्टे. मुंबई शहर गुन्हा रजि. नं. ०७/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे मधील टीव्हीएस अपाची मोटार सायकल या चोरी केल्याचे कबुल केल्याने त्यास अटक करण्यात आली असुन एकुण १,५५,०००/- रू. किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात यश आले आहे.
सदर कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री. जयजीत सिंग, मा. पोलीस सह आयुक्त श्री. दत्तात्रय कराळे, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त श्री शिवराज पाटील (गुन्हे), मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अशोक राजपुत यांचे मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्ष पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, सपोनि / जगदिश मुलगीर, सपोनि / महेश जाधव, पोलीस अंमलदार स्वप्निल प्रधान, राजेंद्र घोलप, संदीप भलेराव, प्रशांत भुर्के, राजाराम शेगर, रूपवंत शिंदे, नगराज रोकडे, किशोर भामरे, राजकुमार राठेड, नवनाथ कोरडे, सदन मुळे व महिला पोलीस अंमलदार आशा गोळे, गिताली पाटील यांनी केली
आनंद रावराणे
वरिष्ठ पोलीस निरिक्षक • मालमत्ता गुन्हे कक्ष, अणे शहर.

Post a Comment

0 Comments