*फर्दापुर प्रतिनिधि : हक्कानी शैख़*
हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी वापरले जाणारे मेटान्हायझियम हे बुरशीयुक्त जैविक कीडनाशक आहे.
वाकोद ता जामनेर
पुणे कृषीप्रधान देश म्हणून भारताला संपूर्ण जगात ओळखले जाते. देशाने कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगली प्रगती केलेली आहे. वाढती लोकसंख्या, वाढती अन्नधान्याची गरज बदलते हवामान यांचा परिणाम शेतीवर झालेला दिसून येतो. परंतु उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर होत आहे. त्याचा पिकांवर तसेच मानवी जीवनावर आणि पर्यायाने पर्यावरणावर घातक परिणाम घडवून येत आहे. रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे किडींमध्ये प्रतिकारक क्षमता विकसित होत आहे. त्यामुळे जैविक शेती ही काळाची गरज बनलेली आहे. हीच गरज ओळखून कृषी महाविद्यालय, पुणे येथील जैविक कीड नियंत्रण प्रकल्प अंतर्गत विविध प्रकारच्या जैविक कीडनाशकांचे उत्पादन केले जात आहे. कृषी पदवीच्या आठव्या सत्रातील कार्यानुभवात्मक शिक्षण या अंतर्गत डॉ.न. द. तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली काजल महाजन आत्मजा जाधव, कुणाल जगताप, अलिशा चौंडकर, नेहा भोसले, तनुजा जाधव हे विद्यार्थी जैविक कीडनाशके तयार करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यापैकी एक जैविक कीडनाशक ‘फुले मिटायझियम’ तयार केले जात असून ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. मेटा हायझियमचा वापर हुमणी, अळी पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मवा. फुल किडे, तुडतुडे इ. किडींच्या नियंत्रणासाठी केला जातो. प्रामुख्याने ऊस, भात, भुईमूग, मका, बाजरी इ. खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटा हायझियम हे प्रभावी जैविक कीडनाशक आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाळ्यात ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामुळे ऊस पिकाच्या उत्पादनावर 30 ते 80 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. हुमणी अळीमुळे होणारे नुकसान पहिल्या दोन अवस्थेतील अळी कुजलेल्या घटकांवर उपजीविका करते. तिसऱ्या अवस्थेतील अळी उसाची मुळे खाण्यास सुरुवात करते. खोडवा पिकातील हुमणीची चौथी अवस्था फार नुकसान करते. मुळे खायला मिळाली नाही तर आळी उसाच्या कांडीत शिरते. शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते. प्रामुख्याने ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पहिल्या पावसानंतर हुमणी अळीच्या नियंत्रणावर लक्ष दिले पाहिजे. मेटा-हायझियम विषयी हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी वापरले जाणारे मेटान्हायझियम हे बुरशीयुक्त जैविक कीडनाशक आहे. ही बुरशी हुमणी अळीच्या शरीरात शिरून त्याची वाढ होते. मेटाहायझियमच्या संपर्कात आलेली अळी साधारण १०-१५ दिवसात मरते. मेटान्हायझियम वापरण्याच्या पद्धती- १) प्रति एकरी ऊस पिकासाठी आठ किलो फुले मेटा हायझियम शेणखतात मिसळून हे मिश्रण पाचटावर किंवा जमिनीवर सम प्रमाणात टाकावे. २) उसाची लागण केलेली असल्यास पहिल्या पाण्यानंतर पंपाला १५० ग्रॅम या प्रमाणात मेटाहायझियम मिसळून नोझल काढून सरीत सोडावे, ३) उसाची मोठी भरणी झाली असल्यास वापसा असताना सरीच्या दोन्ही बाजूला पहारीच्या साह्याने नाळे मारावेत व मारलेल्या नाळ्यात पंपाला १५० ग्रॅम या प्रमाणात मेटा हायझियम सोडावे. ४) खोडवा पिकामध्ये हीच प्रक्रिया १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा करावे.
मुख्य संपादक : प्रतिनिधि :
रशीद शैख़ समीर शाह
8484819485 7066337598
0 Comments