खदानित मिळाला मृतदेह अपघात की घातपात. मुर्तीजापुर शहर पोलिसांसमोर आव्हान!
मुर्तीजापुर (मो.रिजवान सिद्दीक़ी)
जुनी बस्ती परिसरातील खदानित मिळाला मृतदेह अपघात की घातपात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे जुनी बस्ती परिसरातील पावसामुळे खदान तळूब भरलेली आहे घरकुल परिसर मध्ये राहणारे सलीम वय 40 वर्ष या व्यक्तीचा मृतदेह खदानीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी दिनांक 30 जुलै रोजी सात वाजताच्या दरम्यान या परिसरातील काही युवक खदानी जवळ गेले असताना त्यांना पाण्यात मृतदेह दिसून आले. पोलीस स्टेशन आणी खदानीचा अंतर जास्त नसतांनाही घटनास्थळावर पोलीस एक तास उशिराने पोहोचली परंतु हा मृतदेह सलीम नामक युवकाचा असून ही घटना अपघात आहे की घातपात यावर नागरिकांनी संशय व्यक्त करून पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन मध्ये असे घटनाची नोंद असुन अपघाताचा स्वरूप देऊन अद्यापही तपास सुद्धा लागू शकला नाही परंतु या सलीमनामक युवकाचा पाण्यात मिळालेला मृतदेह यांनी पुन्हा शहर पोलिसांसमोर आव्हान निर्माण करून दिले आहे.
0 Comments