फर्दापूर (प्रतिनिधि )हक्कानी शेख
फर्दापुर, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी च्या पायथ्याशी असलेल्या अभ्यागत केंद्रात मागच्या वर्षी 23.2.2022 मध्ये दरोडेखोराकडून दरोडा टाकण्यात आला होता यामध्ये बाराशे लिटर आँईल तसेच ट्रान्सफॉर्मर मधील काँपर चे तार चोरी करण्यात आली होती यांची किंमत दोन लाख रुपये एवढी होती यातील दरोडेखोर यांनी येथील वाचमन यांना मारहाण करण्यात येऊन मोबाईल फोडून सर्वांना एका खोलीत कोंडून सर्व मुद्देमाल चोरून नेले परंतू फर्दापूर पोलिस स्टेशन येथून तपास चक्र फिरवून सर्व आरोपी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले
असून यावेळी यातील पाच आरोपी यांना औरंगाबाद या जिल्ह्यातून एका वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून यातील पाच शेख मुजीब शेख नुर वय 42 शेख शाहरुख शेख नजीर 29 ,आजीमखान सादिकखान वय 36 रा वालसांगावी ता भोकरदन जि जालना,शेख रफीक ख्वाजा वय 47रा रेगटींपुरा मोंढा औरंगाबाद वसीम खान सत्तार खान वय 32 रा कैसर काँलनी औरंगाबाद या सर्व आरोपी वर विविध पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत तसेच फर्दापूर पोलिस स्टेशन मध्ये सर्व मुद्देमालासह आरोपी पकडण्यात आले असून मा जिल्हाधिकारी साहेब तसेच पोलिस अधीक्षक साहेब यांनी एका वर्षासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले या तपास फर्दापूर पोलिस स्टेशन सहा पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे, सहा पोलिस निरीक्षक भारत मोरे पोलिस कर्मचारी निलेश लोखंडे, योगेश कोळी, प्रकाश कोळी, सतीश हिवाळे यांनी अहोरात्र तपास करून आरोपींना अटक करण्यात येऊन आवाहल सादर करण्यात आला असून आरोपींना एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले
0 Comments