'दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दिल्ली येथुन चोरी केलेल्या दोन मोटार कार सह तसेच विनापरवाना अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस जवळ बाळगणाऱ्या आरोपीस अटक '
कानदिवलि प्रतिनिधि, मुम्बई
दिनांक :- २३/०७/२०२३ रोजी कांदिवली पोलीस ठाणे चे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक हेमंत गिते यांना त्याचे गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, एक इसम हा कांदिवली पोलीस ठाणे हद्दीत गावठी कट्टा घेवून येणार आहे. त्या अनुषगांने सह,पो, निरक्षक हेमंत गिते व पथक यांनी मा. वरिष्ठाची परवानगीने कांदिवली पश्चिम मुंबई येथील गरुडा पेट्रोल पंप समोर मेरेडियन बार, फुटपाथ वर लिंक रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई या ठिकाणी छापा टाकुन एका इसमास पकडले असता त्याचेकडे विनापरवाना गावठी कटटा, व ०१ काडतुस हे अग्नीशस्त्र मिळुन आले सदर बाबत त्याने विनापरवाना अग्नीशस्त्र जवळ बाळगले म्हणुन त्याच्या विरुध्द कांदिवली पोलीस ठाणे गु.र.क्र. ४८५ / २०२३ कलम ३,२५ भारतीय हत्यार बंदी कायदा सह ३७ (१) (अ) १३५ महा. पो. कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास सह, पो, नि, हेमंत गिते यांनी केला असता अटक आरोपीताच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपीताने त्याचे मुळ गावी असलेले साथीदाराच्या मदतीने यांनी राज्य दिल्ली या ठिकाणाहून दोन मोटार कार चोरी असल्याचे निष्पन्न झाले सदर मोटार कार तसेच अग्नीशस्त्र हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मुंबई आणले असे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये आहे अधिक तपास करीत आहोत. आरोपीताकडुन हस्तगत करण्यात आलेल्या मुददेमाल खालीलप्रमाणे आहे,
(१) एक गावठी कट्टा व ०१ जिवंत काडतुस अंदाजे किमत २,५०० रुपये (२) एक निळया रंगाची एक्सेस मोटार सायकल अंदाजे किंमत ५० हजार रुपये
(३) एक पांढऱ्या रंगाची इटरिगा मोटार कार अंदाजे किंमत ५ लाख रुपये (४) एक पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची रंग पांढरा, अंदाजे किंमत ४ लाख रुपये
आरोपीताचे नाव व पत्ता:- फरहान हनीफ कुरेशी उर्फ सोनु वय २८ वर्षे धंदा नाही रा. ठिकान नवघर व्हिलेज मिरा रोड, पूर्व मिरा भाईंदर जि. ठाणे.
आरोपीताचा पूर्व इतिहास
(१) समतानगर पोलीस ठाणे गुरक ३६ / २०२० कलम १२० (ब) ४५२, ३९३, ३९८, ३४ भादवी सह ३, २५ भाहका
(समतानगर पोलीस ठाणे हददीत प्रमाणिक जेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता)
सदर यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त ( का व सु), मा. अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग श्री. राजीव जैन, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ११ श्री. अजयकुमार बंसल, गा. सहाय्यक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग श्री. शैलेंद्र धिवार यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संदिप विश्वासराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांदिवली पोलीस ठाणे यांचे प्रत्यक्ष देखरेखीखाली सहा. पोलिस निरीक्षक हेमंत गिते, पोलीस उप निरीक्षक इंद्रजीत भिसे, व गुन्हे प्रकटीकरण पथक पो.ह जगदाळे, पो.ह जैतापकर, पो.ह तावडे, पो. शि राउत, पो.शि. केसरकर, पो.शि. हिरेमठ, पो.शि. घोडके यांनी पार पाडली आहे.
0 Comments