सोयगांव तालुक्यातील तिडका येथील अंगणवाडीची इमारतीची भीषण दुरवस्था, प्रशासनाचे पुर्णतः दुर्लक्षछताला पडले धोकादायक तडे,बालकांचा जीव धोक्यात

सोयगांव तालुक्यातील तिडका येथील अंगणवाडीची इमारतीची भीषण दुरवस्था, प्रशासनाचे पुर्णतः दुर्लक्ष
छताला पडले धोकादायक तडे,बालकांचा जीव धोक्यात,
फर्दापुर (प्रतिनिधी)  हक्कानी शेख

 सोयगांव तालुक्यातील तिडका येथील अंगणवाडी क्र.२८ या अंगणवाडीची अत्यंत दुरावस्था झाली असुन, ठिक ठिकाणी घुशींनी अंगणवाडीच्या खोल्या पोखरून ठेवल्या आहेत, काही ठिकाणी अंगणवाडीच्या भिंतींना तडे पडल्या मुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर
विद्यार्थ्यांना बसण्याच्या जागेवरील फर्शी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्याच्या प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत अंगणवाडी सेविकेंसह ग्रामस्थांनी सदर अंगणवाडी इमारत तात्काळ दुरुस्तीची प्रशासनाकडे मागणी  केली आहे. 
 *आता सध्या पावसाळा चालू असुन पाऊस आल्यावर लहान मुलांना बसण्यासाठी जागा देखील राहत नाही.त्या अंगणवाडी इमारतीच्या छताचे प्लॉस्टर देखील काही ठिकाणी पडलेले आहे तसेच खाली बसवलेली फरशी देखील उखडलेली असुन भिंतींना मोठया प्रमाणात   तडे गेलेले आहेत त्यामुळे विध्यार्थ्यांचा जीव सुध्दा आलेला आहे. तरी सदर
अंगणवाडीची इमारत लवकर दुरुस्ती करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
तिडका येथील अंगणवाडीची पुर्ण इमारत च  घुशींनी पुर्ण पोखरुन ठेवलेली जागा. दुसऱ्या छायाचित्रात उघडलेल्या फरशा तर तिसऱ्या छायाचित्रात छताचे प्लॉस्टर कोसळलेले,
लहान मुलांच्या जीवितास धोका
■सदरील अंगणवाडीची बिकट अवस्था झाली असुन लहान बालकांना शिकण्याची गोडी लागावी यासाठीच अंगणवाडी असते जर त्याच इमारतीची अशी अवस्था झाली असेल तर कसे उद्याचे बालक तयार होतील? तरी सुद्धा अंगणवाडीत प्रत्येक पालक आपल्या मुलांना अंगणवाडी मध्ये पाठवतात परंतु अंगणवाडीतच घाणीचे साम्राज्य पसरल्याने लहान बालके आजारी पडत असल्याने काही पालक आपाल्या मुलांना अंगणवाडीची अवस्था पाहुन घरी घेऊन जात आहेत पावसाळ्याचे दिवस असुन घुसीने  मोठमोठे बिळ तयार असुन सरपटणारे प्राणी देखील निघु शकतात बालकांचे काही बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे
अंगणवाडी क्र. २८ मध्ये जवळपास ४४ मुलांची संख्या असुन ह्याच अंगणवाडीत  काही ठिकाणी पोखरून नळे जमा झालेला आहे अंगणवाडीच्या सेविकेनी ग्रामपंचायत प्रशासनास देखील देण्यात आली,
 सदर तक्रार पठाण यांच्यासह ग्रामस्थांनी केली. अंगणवाडीस ठीकठीकाणी गळती पडत असून  मातीचा ठीग सुद्धा साचलेला आहे.सदर अंगणवाडीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी  काही दिवसांपूर्वी लेखी तक्रार ग्रामपंचायत प्रशासनाकडे दुरुस्तीसाठी केली आहे. परंतु आजपर्यंत सदर अंगणवाडी पाहाण्याची देखील तसदी या ग्रामपंचायत प्रशासनांनी घेतलेली नाही.
तर सदर अंगणवाडीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मोसीम पठाण, कासम पठाण, वसीम पठाण, फरान सय्यद सिराज तडवी, आरीफ तडवी, अमिन तडवी यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments