पातूर तालुका प्रतिनिधी,जुबेर शेख
पातुर येथील सुप्रसिद्ध कवी कलावंत पत्रकार देवानंद गहिले यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवस कलेचा या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन पातुर येथील संत सेवालाल महाराज सभागृह येथे करण्यात आले होते
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार रवींद्र काळे तर नायब तहसीलदार विजय खेडकर पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन पोटे, अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मत ढाळे केंद्रीय कार्याध्यक्ष तुळशीरामजी बोबडे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुशे, पातुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक देवानंद गहिले, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष वासुदेवराव खोपडे, अंकुरचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णरावजी घाडगे, पातुर तालुका अध्यक्ष नारायण रावजी अंधारे, डॉ. मनोहर घुगे, तालुका सचिव प्रा. विठोबा गवई, पारसच्या सर्पमित्र प्रतिभाताई ठाकरे, सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य महादेव महाराज निमकंडे, पत्रकार इरफान शेख, संजय
गोतरकर, शाहबाबु महाविद्यालयाचे प्राचार्य शेख असलम सर, प्रा. विलास राऊत, देविदास निलखन, डॉ. शांतीलाल चव्हाण, प्रल्हादराव बोचरे, जयसिंग जाधव, डॉ. ओ. एम. ओसवाल आदीची यावेळी मंचावर उपस्थित होती
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पातुर तालुक्यातील लेखक, कवी च्या पुस्तकांच्या निर्मितीचे पूजन करून दीप प्रज्वलन केले
त्यानंतर वाढदिवसानिमित्त देवानंद गहिले यांचा मराठी पत्रकार संघ, अंकुर साहित्य संघ, ग्राहक पंचायत पातूर, अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी समिती, तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान, यांनी स्वतंत्र केक कापून वाढदिवसाबद्दल सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी पातुर तहसीलदार रवींद्र काळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे मार्गदर्शन केले
याप्रसंगी आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवांमध्ये एकापेक्षा एक कलावंत गायकांनी आपली गायन कला सादर केली
यामध्ये सुप्रसिद्ध गायक देविदास निलखन, प्रा. विठोबा गवई, , मुदतशीर, प्रा. सृष्टी धांडे, तुळशीरामजी बोबडे, प्रा.करुणा गवई, डॉ. मनोहर घुगे तसेच देवानंद गहिले
दीपमाला गहिले यांनी सुद्धा गाण्याचे सुंदर गायन करून कार्यक्रमात रंग आणला नंदकिशोर ठक, कृष्णराव घाडगे, मुकुंद कवडकर, पत्रकार इरफान शेख, जुबेर शेख, श्रीमती बेबीताई इंगळे, भारतीताई गाडगे, आराध्या इंगळे, शेख वसीम आदिसह इतर गायक कलावंतांनी एकापेक्षा एक अशी सकस दर्जेदार गीत गायन करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले
या कार्यक्रमात पारस येथील झुंजार रणरागिनी सर्पमित्र प्रतिभा ठाकरे आणि आस्टूल येथिल सावित्रीबाई फुले लेझीम पथकाच्या प्रमुख शीलाताई कांबळे (खरात) यांचा विशेष सत्कार सामाजिक कार्याबद्दल तहसीलदार रवींद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आला आहे तर याचवेळी राज्यस्तरीय स्पर्धा राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये द्वितीय क्रमांक आलेल्या भारत इंगोले यांच्या "भाकर" कवितेबद्दल त्यांचा सत्कार सन्मानचिन्ह आणि रोख बक्षीस देऊन करण्यात आला आहे
इयत्ता दहावी मध्ये विशेष गुण प्राप्त करणाऱ्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मराठी पत्रकार संघाचे वतीने सन्मानपत्र देऊन यावेळी करण्यात आला आहे
तर यावेळी गुरुदेव राष्ट्रसंत युवा मंच, राखोंडे परिवारसाने गुरुजी मंडळ पातुर, श्री सिदाजी महाराज संस्थान, सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघ शिरला,
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कलावंत प्रा. करुणाताई गवई यांनी केले तर काव्य स्पर्धेचे संचालन प्रा. मुकुंद कवळकार यांनी केले आणि आभार प्रदर्शन अंकुर साहित्य संघाचे पातुर तालुका अध्यक्ष नारायण रावजी अंधारे यांनी व्यक्त केले
या कार्यक्रमाला नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ वर्षाताई बगाडे, सौ. वैशालीताई निकम, सौ. उर्मिलाताई गाडगे, मीनाताई ऊपरवट, वर्षा अंभोरे, श्रीमती बेबीताई इंगळे, रजनी पुंडे, ज्योतीताई दाभाडे, सुप्रिया इंगळे, प्रा. शंकर गाडगे, माजी मुख्याध्यापक रमेश काळपांडे, प्रा. वसंतराव गाडगे, गोविंदराव देशमुख, छोटू भाऊ जोशी, छगन कराळे, संदीप गिऱ्हे, सुहास देवकर, लक्ष्मणराव बारतासे, रजनी पुंडे, पंकज पोहरे, प्रकाश अंभोरे, गणेश श्रीनाथ, बाळू भाऊ इंगळे, नामदेव जाधव आदी सह पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, अंकुर साहित्य संघ, ग्राहक पंचायत पातुर, तनिष्का स्त्री प्रतिष्ठान अभियान, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन यांच्यासह इतर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,
0 Comments