संकटात असलेले रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळालेली मदत नागपूर मुंबई रेल्वे मार्ग पुन्हा सुरू

संकटात असलेले रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळालेली मदत नागपूर मुंबई रेल्वे मार्ग पुन्हा सुरू
  मूर्तिजापुर प्रतिनिधि(मोहम्मद रिजवान सिद्दिकी)

 मुर्तीजापुर तालुक्यातील अंतर्गत असलेल्या माना परिसरातील जितापूर पुल Bridge जवळ रेल्वेच्या रुळाखालील गिट्टी डब्बर वाहून गेल्याने नागपूर व मुंबईकडे येना जाणा करणारे रेल गाड्या थांबवण्यात आल्या होत्या अशा परिस्थितीत मेमो ट्रेनच्या संकटात असलेले रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळालेली मदत त्यांच्यासाठी वरदान मिळाल्यासारखे आहे 
 सोमवार दिनांक 10 जुलै रोजी. तालुक्यातील शिवसैनिक विठ्ठल नाकाट आणि रवींद्र निकम पाऊस वाढल्याने शेड खाली थांबले त्यासोबत रेल्वे कर्मचारीही होते या दोघांची शिवसैनिकांना पाण्याचा प्रभाव वाढल्याने रेल्वेचे रुळाखाली मोठा खड्डा निर्माण झाला हे दिसून आले त्यांनी व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने या रुळावर येत असलेली मेमो ट्रेनला हात दाखवून थांबवण्यात आली तोपर्यंत मेमो ट्रेन ज्या ठिकाणी रुळाखाली गिट्टी डब्बर वाहून गेली त्या ठिकाणी पोचली होती मेमो ट्रेनच्या बाहेर उतरून पाहिले आणि ट्रेन मागे घेतली जर ट्रेन पुढे गेली असती तर मोठा अपघात घडला असता सुदैवाने ही घटना टळली जीतापूर रेल्वे गेट 55 कडे मेमो ट्रेन ला थांबवण्यात आले . माना परिसरात संध्याकाळी पाच वाजता पासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली हिरपुर गेट जवळ लोहा मार्ग खालून जाण्यासाठी भुयारी रस्त्याचे काम सुरू आहे या ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी उत्तम मार्ग नसल्याने हे सर्व पाणी रेल्वे रुळावर आले त्यामुळे पाण्याचा प्रभाव वाढला आणि रुळावरील गिट्टी डब्बर वाहून गेल्याने दहा ते बारा फूट मोठा खड्डा निर्माण झाला मेमो ट्रेन तीन तास जीतापूर जवळ थांबा देऊन पुन्हा मुर्तीजापुर रेल्वे स्थानकाकडे पाठवले रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुळाखाली वाहून गेलेली गिट्टी डब्बर दुरुस्तीचा काम युद्ध स्तरावर सुरू होता रात्रीपर्यंत कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन सदर रास्ता दुरुस्त केला. बदल करण्यात आले काही प्रवाशांना महत्वाचे ठिकाणी पोहोचणे आवश्यक होते परंतु गाड्या रद्द झाल्यामुळे त्यांना आपल्या कर्तव्यावर रुजू होत न आल्याने *अनेक प्रवाशांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली मात्र प्रवासांना त्रास झाला परंतु अनेकांचे प्राण वाचले हे महत्त्वाचे,आमदार हरीश पिंपळे कडून मदत रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आमदार हरीश पिंपळे कडून चहा पाणी व बस खाजगी बस सेवा उपलब्ध करून दिली प्रवाशांना धीर देण्यासाठी आमदार पिंपळे यांनी त्यांच्याशी चर्चा करून अनेक प्रवाशांना मदत केली- 
शिवसैनिक मदतीला धावले जीतापूर भागात उभी असलेली मेमो ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवाशांना मदतीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख अप्पू तिडके, पंचायत समिती उपसभापती देवाशिष भटकर, प्रफुल्ल गावंडे विलास वानखडे (जीतापूर) प्रमोद खेडकर या सर्वांनी रेल्वे प्रवाशांना चहा बिस्कीट पाण्याची व्यवस्था केली- या रूळ्वर रेल गाडीची गती कमी करून धावणार. जीतापूर जवळ झालेली घटना मुळे रात्रीपर्यंत कर्मचाऱ्यांनी काम केले सदर रूळ दुरुस्त केले या रुळावर प्रत्येक रेल गाड्या 100 चे स्पीड धावणारे त्या गाड्यांची गती कमी करून त्या रूळावरून 10-15 चे स्पीडने जाणार आहे.
रेल्वे रूळाचा काम रात्री दोन वाजता आटोपला नंतर बडनेरा मध्ये सहा वाजता पासून उभी असलेली ज्ञानेश्वर आमदाबाद सुपरफास्ट ट्रेन रवाना झाली अप रूळावर काही वेळातच गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस हे सुद्धा धावली डाऊन रुळावर मुर्तीजापुर रेल्वे स्थानकावर अनेक तासापासून उभी असलेली आमदाबाद हावडा एक्सप्रेस हे सुद्धा रवाना झाली अमरावती मुंबई तसेच मेमो ट्रेन या दोन्ही गाड्या रद्द करण्यात तसेच पुरी सुरत एक्सप्रेसला नरखेड येथून इटारसी खंडवासाठी परवानगी देण्यात आली सुरत मालदा एक्सप्रेस ला खंडवा इटारसी नागपूर येथून रवाना करण्यात आली इतर रेल गडांची सुद्धा व्यवस्था अनेक मार्गाने करण्यात आली.
सायंकाळी 5 ते 2.30 वाजेपर्यंत म्हणजेच संपूर्ण 9.30 तास रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर दुपारी 2.30 वाजता दोन्ही मार्ग सुरू करण्यात आले. यावेळी रेल्वेचे विभागीय अधिकारी भुसावळ, बांधकाम अभियंता वसेकर iow बडनेरा, रेल्वे ट्रॅक अभियंता राहुल घोडगे pwi बडनेरा, रेल्वे ट्रेनचे निरीक्षक टी. बडनेरा, कनिष्ठ विभाग अभियंता जे.ई. केदारनाथ कौल मन-कुरम आणि रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) उपस्थितीत शेकडो ट्रॅकमननी मोठ्या मेहनतीने दोन्ही मार्ग सुरू केले. यावेळी बीटी ट्रेनमध्ये कुरम येथून गिट्टी व बोल्डर भरून काम करण्यात आले.

Post a Comment

0 Comments