अनेक गावाचा संपर्क तुटला, घरे सहित अन्नधान्य सोयाबीन बीज बियाणे व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान,
मुर्तीजापुर ता, प्रतिनिधि (मोहम्मद रिज़वान सिद्दीक़ी)
तालुक्यातील मुसळधार पावसाचा कहर वाळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडलेली आहे रात्री बारा वाजता पासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुर्तीजापुर तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्याचा इतर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे
मुर्तीजापुर तालुक्यातील चिखली कासवी खराब ढोरे सालातवाडा या भागात खोराळ नाल्याचा पाणी गावात घुसल्यामुळे शंभर चे दीडशे घरात पाणी साचले संपूर्ण शेती खरडून गेली त्याच बरोबर घरातील अन्य धान्य बीज बियाणे व इतर घरातील महत्त्वाचे साहित्य गाई बैल हे सुद्धा पाण्यात वाहून गेले तर काही मरण पावले पाण्यात वाहून गेलेले उईके नामक व्यक्तीला संत गाडगे बाबा पथक। दीपक सदाफड़े यांच्या मदतीने त्याचे प्राण वाचवण्यात आले,
घटनेची माहिती मिळताच रात्री चार वाजता उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार तहसीलदार शिल्पा बोबडे घटनास्थळावर जाऊन संपूर्ण पाहणी केली तालुक्यातील मंगरूळ कांबे मूर्तिजापूर दातवी लाखपुरी या भागाचा पाण्यामुळे संपर्क तुटल्याने या भागातील अनेक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले नदी काठावर असलेल्या गावात सुद्धा नुकसान झाले आहे कर्तव्यदक्ष तहसीलदार शिल्पा बोबडे भर पाण्यात उतरून शेतकऱ्यांची समस्या जाणून घेत आहे कंजरा बालापुर लोदीपुर आरखेड किनखेड किनीफनी या भागात सुद्धा अनेक घरात पाणी घुसल्याने नुकसान झाले.
शेतात पाणी गेल्याने संपूर्ण शेत खरडून गेले महसूल विभाग या संदर्भात सतर्क राहून विविध ठिकाणी मदत पोहोचविण्याचा काम सुद्धा करत आहे कुरूम माना सोपीनाथ कवठा या भागात सुद्धा नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या व इतर नागरिकांचे झालेल्या नुकसान चिंता चा विषय बनला आहे तलाठी यांच्यामार्फत विविध ठिकाणी सर्वे करण्याचे आदेश तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिलेले यावेळी तहसीलदार उमेश बनसोड नायब तहसीलदार पांडे तलाठी गजानन भारसाकडे तलाठी दिनकरराव ठाकरे तलाठी भाग्यश्री देशमुख तलाठी वि वी राऊत ग्रामसेवक बाळकृष्ण सोळंके सहित अनेक तलाठी ग्रामसेवक कामाला लागले आहे आहे पंचनामा करून त्वरित मदत जाहीर करा मुर्तीजापुर तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यतर नागरिकांचे नुकसान झाले नुकसानीत अनेकांचे घरात पाणी घुसले त्यामुळे साहित्य अन्यधान्य त्याचबरोबर शेतीत पाणी घुसल्याने संपूर्ण शेती खरडून गेली आहे
गोरड वारल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे म्हणून शासनाने विलंब न करता शेतकऱ्यांना वैताग नागरिकांना जागेवरच पंचनामा करून आर्थिक मदत तेव्हाच्या तेव्हाच जाहीर करावी अप्पू तिडके शिवसेना तालुकाप्रमुख मुर्तीजापुर नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करणे गरजेचे मुर्तीजापुर तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना व शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुर्तीजापुर तालुक्याचा दौरा करावा शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घ्यावी आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी जेणेकरून शेतकऱ्यांना जगण्यासाठी आधार मिळेल अन्यथा शेतकऱ्यांची आत्महत्या वाढले तर याची जबाबदारी शासनाची राहील रवी राठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव एक तास काटेपूर्णा थांबला विदर्भ एक्सप्रेस मुर्तीजापुर तालुक्यात पावसाचा प्रमाण वाढल्याने काटेपूर्णा येथे विदर्भ एक्सप्रेस एक तास थांबवण्यात आले व इतर रेल गाड्यांना दहाच्या स्पीडने निघण्याचे आदेश देण्यात आले, कमळगंगा नदीचा पाणी शेतात घुसल्याने नुकसान मुर्तीजापुर तालुक्यातील हादगाव परिसरात कमळ गंगा नदीचा पाणी घुसल्याने शेतकऱ्यांच्या शेत खरडून गेल्याने नुकसान झाल्याची घटना घडली आहे तलाठी दिनकरराव ठाकरे सर्वे करत आहे -
0 Comments