*शिवाजी नगर प्र. क्र. 2 Smart रस्त्यांना आले नदीचे स्वरूप*
जळगाव:(शाह एजाज़ गुलाब)
शहरातील शिवजी नगर प्र. क्र. 2 मध्ये पावसाचा पाण्या मुळे गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले त्यामुळे या रस्त्यानं जणू नदिचे स्वरूप आहे आहे या विषय अधिक माहिती अशी की शिवाजी नगर मधील मकरा अपरमेंट समोरील तसेच राजवाडा परिसरातील गटारी कित्येक महिन्यापासून साफ झालेली नाही आणि मकरा अपार्टमेंट समोरील सहा महिन्या पूर्वी हीच गटार खोदून त्या ठिकाणी डापा टकने होते पण सदर ठिकाणी फक्त सिमेंट पाईप टाकून ती गटार तशीच मोकळी सोडून दिलेली आहे आणि हीच गटर मागील अनेक महिन्यापासून व्यवस्थित रित्या साफ केलेली नाही
पावसाळापूर्वी सामाजिक कार्यकर्ते युसुफ शाह यांनी निवेदनाद्वारे सदर गटार संपूर्ण साफ करण्याची मागणी प्रभागातील आरोग्य अधिकारी यांना केली होती दोन महिने होऊनही माननीय आरोग्य अधिकारी आणि सफाई कर्मचारी यांनी या गटारीला साफ केले नाही त्यामुळे गटारीचा संपूर्ण पाणी रस्त्यावर येऊन रस्त्याला नदीचे स्वरूप आले यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच लहान मुलांना देखील त्रास होत आहे.
0 Comments