फर्दापुर,प्रतिनिधि शेख हक्कानी,
तोंडापूर ता जामनेर दि तोंडापूर परिसरात मोठ्या प्रमाणात कपाशीच्या पिकाची लागवड करण्यात आली आहे काही शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकाची वाढ न होता पिवळ्या पडून नुकसान होत असल्याने गावातील दुकानातून घेतलेल्या खताच्या वापरामुळे हा प्रकार झाला असल्याने शेतकऱ्यांनि तालुका कृषी अधिकारी चोपडे व ग्राम विकास कृषी अधिकारी राजू ढेपले याच्याकडे संबंधीत दुकानदार याच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे
तोंडापूर येथील बालाजी ट्रेडर्स या दुकानातून सुपर फास्फेट व सिंगल फास्फेट हे सरदार अग्रो फर्टिलायझर केमिकल कंपनीचे भारतीय जन उर्वरक परियोजना असे लिहिलेल्या खताचा वापर केलेल्या कपाशीच्या शेतातील कपाशीच्या पिकाची वाढ होत नसून शेंडा उलडा पडून पाने पिवळी पडत असल्याने कपाशीच्या पिकाचे नुकसान होत असल्याचे तोंडापूर परिसरातील दहा ते बारा शेतकऱ्यांन च्या लक्षात आले तर कुंभारी बु येथील शेतकरी भिसे याच्या शेतात कपाशी व मिरची ला खत दिल्याने पाने पिवळे होवून कपाशी सुकत चालली आहे राजू गव्हाणे याच्या शेतात कपाशी ला खत देतांना खत संपल्यानंतर उरलेल्या झाडाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली व खत वापरलेल्या झाडाची वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांन च्या हे लक्षात आले कि आपल्या शेतात वापरलेल्या खत हे बोगस असून खताच्या वापरामुळे कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शेतकऱ्यांनि बालाजी ट्रेड र्स च्या वितरक यांना माहिती देण्यात आली असता कंपनीच्या वतीने फील्ड अधिकारी यांनी पाहणी करण्यात आली झालेला प्रकार संबंधित दुकानातून खत घेवून कपाशी पिकाचे नुकसान झाले,
त्या शेतकऱ्यांच्या वतीने जामनेर तालुका कृष्णा अधिकारी व ग्राम विकास अधिकारी याच्याकडे प्रताप भुतेकर कडुबा जिरी राजु गव्हाने अशोक भिसे बाळू पाटील आत्माराम पाटील नारायण महाजन यांनी भेट देवून सुधाकर पाटील याच्या नावाने तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे बोगस खत विक्री करनाऱ्या दुकानदार व कंपनीच्या विरूध्द कार्यवाही करण्याचो मागणी शेतकऱ्यांन च्या वतीने करण्यात आहे,
0 Comments