पित्याला बेदम मारहाण करून मुलीचा विनयभंगबरा जणांवर गुन्हा दाखल : सोयगाव तालुक्यातील घटना

पित्याला बेदम मारहाण करून मुलीचा विनयभंग
बरा जणांवर गुन्हा दाखल : सोयगाव तालुक्यातील घटना
फर्दापूर, (प्रतिनिधी) हक्कानी शेख 

फर्दापूर,  तू माझ्या मुलाविरोधात दाखल केलेली केस मागे घे, असे म्हणत मुलीच्या वडिलांच्या डोक्यात कुन्हाडीच्या तुंब्याने हल्ला करून मुलीचा विनयभंग केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील रवळा शिवारात शुक्रवारी (दि. २८) रोजी सकाळी घडली. दरम्यान, याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगलसिंग पाटील, ऋषिकेश मंगलसिंग पाटील, आकाश मंगलसिंग पाटील, आनंदसिंग चंद्रसिंग पाटील, साहेबराव खुशालसिंग पाटील व अमरसिंग चंद्रसिंग पाटील (सर्व रा. रवळा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहाही जणांची नावे आहेत.
रवळा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी (दि. २८) मुलगी तिच्या वडिलांसोबत दुचाकीवरुन पिंपळा येथील महाविद्यालयात बी. कॉम.च्या प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी जात होती. सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास रवळा शिवारात आल्यानंतर मंगलसिंग पाटील याने मुलीच्या वडिलांची मोटारसायकल अडवून मुलीचा विनयभंग केला. तू माझ्या मुलाविरोधात दाखल केलेली केस मागे घे, असे म्हणत त्याने मुलीसोबत अश्लील कृत्य केले. यावेळी मुलीच्या वडिलाने मुलीला त्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करून मंगलसिंग पाटील याने हातातील कुन्हाडीच्या तुंब्याने पीडित मुलीच्या वडिलाच्या डोक्यावर हल्ला केला. याचवेळी सदर आरोपींनी मंगलसिंग यास साथ दिली. दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवरून सदर सहा जणांविरुध्द फर्दापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सह, पो, नि. भरत मोरे पो.ना. नीलेश लोखंडे, योगेश कोळी हे करीत आहेत.तर या अरोपिना समोरच्या आरोपी विरुध कॉराउस FIR दर्ज केला आहे
फिर्यादी मंगलसिंग चंद्रसिंग पाटील वय 51 वर्षे व्यवसाय नोकरी शिक्षक रा रवळा तालुका सोयगाव
यानी म्हणाले की आरोपी क्रमांक1) कैलास गणपत जाधव( 2) विलास गणपत जाधव.(3) सचिन विलास जाधव(.4) दिनेश रूपसिंग जाधव 5) यश मनोहर जाधव.(6) विशाल रामचंद्र शिंदे सर्व रा रवळा तालुका सोयगाव ,नमूद केले की आरोपी क्रमांक (1) हा फिर्यादीचे शेताजवळ म्हशी चारत असताना दिसला तेव्हा फिर्यादी त्यास म्हणाला की तू येथे म्हशी चारू नको मला माझे बैल चारायचे आहेत असे समजावत असताना यातील आरोपी क्रमांक (1 )याने आरोपी क्रमांक( 2 )ते (6) यांना तेथे बोलावून गैर कायद्याची मंडळी जमून आरोपी क्रमांक( 2) याने त्याचे हातातील लाकडी दांडा फिर्यादी चे डोक्यात मारून फिर्यादीचे डोके फोडून दुखापत केली आहे तसेच आरोपी क्रमांक (3 )व (5) यांनी फिर्यादीचा मुलगा आकाश याला पण काठीने मारून दुखापत केले आहे तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्या देउन म्हणून या आरोपी विरुद(1) कैलास गणपत जाधव (2) विलास गणपत जाधव.(3) सचिन विलास जाधव.(4) दिनेश रूपसिंग जाधव (5) यश मनोहर जाधव.(6) विशाल रामचंद्र शिंदे सर्व रा रवळा तालुका सोयगाव फर्दापुर सहा जणांविरुध्द फर्दापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सपोनि. भरत मोरे पो.ना. नीलेश लोखंडे, योगेश कोळी एम.ए ताडवी हे करीत आहेत,

Post a Comment

0 Comments