रविवारी सुट्टीमुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे पर्यटकांची गर्दी ,फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणीपर्यंत फक्त एसटी महामंडळाच्या बसेस धावतात.

रविवारी सुट्टीमुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे पर्यटकांची गर्दी ,
फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणीपर्यंत फक्त एसटी महामंडळाच्या बसेस धावतात.
फर्दापुर (प्रतिनिधि) हक्कानी शेख

 फर्दापुर (प्रतिनिधि) जगप्रसिद्ध अजिंठा लेणी सुंदर नैसर्गिक हे निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असल्याचे दिसते.सगळीकडे पावसाच्या थेंबांसह हिरवेगार दृश्य, डोंगराच्या उंचीवरून वाहणारा धबधबा, डोंगरात कोरलेल्या लेणया, हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. 
 रविवारी 3728 पर्यटकांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचा आनंद लुटला. पर्यटकांच्या गर्दीमुळे एसटी महामंडळ, पर्यटन महामंडळ आणि भारतीय पुरातत्व विभागाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे फर्दापूर टी पॉइंट येथील पर्यटन महामंडळाचे पार्किंग फुल्ल झाले होते.
रविवार, 16 रोजी पर्यटकांच्या गर्दीमुळे पर्यटक फर्दापूर टी पॉइंटवर बसच्या तिकिटासाठी 500 मीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोयगाव आगारात बसेसची कमतरता असल्याने याठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याने देशी-विदेशी पर्यटक एसटी महामंडळावर नाराज असल्याचे दिसून आले. सोयगावच्या आगार व्यवस्थापकानी दुपहरी बसेसची संख्या व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली.
.               शाळकरी मुलांमध्ये नाराजी

 फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणीपर्यंत फक्त एसटी महामंडळाच्या बसेस धावतात. मात्र या बसेसमध्येही ५ वर्षांच्या मुलांकडून पूर्ण भाडे आकारले जात आहे, जे अत्यंत चुकीचे आहे. तर दुसरीकडे बसमध्ये मुलांकडून निम्मे भाडे आकारले जाते. मग अजिंठा लेणीत असे का. असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला.
.                   कड़ी सुरक्षा वयवस्था


पर्यटकांच्या गर्दीमुळे फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फर्दापूर टी पॉइंट, अजिंठा लेणी येथे पो.न,  नीलेश लोखंडे, पो. कॉ, भारत कोली, विनोद कोली, योगेश कोली, ताड़वी यासह इतरांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments