फर्दपुर प्रतिनिधि,शेख हक्कानी कि रिपोर्ट
फर्दापूर . जंगला तांडा येथील ग्रामपंचायतीच्या मार्फत गावात पाॅवर बॅट कंपनी च्या बॅटरी बसविण्यात आल्या होत्या
परंतु हि पाॅवर बॅट कंपनी ची बॅटरी 30 जून ला चोरी झाली असल्याचे ग्रामविकास अधिकारी नागोराव किसन गोरे वय 32 यांनी फर्दापूर पोलिस स्टेशन मध्ये येऊन अज्ञात चोरांविरूध तक्रार दाखल करण्यात आला असता फर्दापूर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत मोरे यांनी तपास चक्र फिरवून आरोपी महादेव नामदेव मुळे वय 19 रा भवानीपुरा,सागर प्रकाश बारुड वय 25 रा वेताळवाडी ता सोयगाव जिल्हा औरंगाबाद यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून यांच्या कडून पाॅवर बॅट कंपनी बॅटरी किंमत 8500 रुपये किंमतीची जप्त करण्यात आली असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत या तपासकामी पोलिस कर्मचारी निलेश लोखंडे, योगेश कोळी, प्रकाश कोळी, कल्पना चाथे यांनी ताबडतोब आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले,
0 Comments