जीतापूर जवळ रेल्वे पटरी चे डब्बर घसरले.
शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला.  
 मुर्तीजापुर प्रतिनिधि मो.रिजवानसिद्दिकी 

 आज दि, 10/07/2023 रोज़ी  माना अंतर्गत येत असलेल्या जीतापूर जवळ रेल्वे पटरी चे डब्बर घसरले मोठा अनर्थ टळला मिळालेल्या माहितीनुसार माना परिसरात पाच वाजता पासून पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसामुळे जीतापूर जवळ शेतकरी आपल्या शेतात काम करत होते,

 पावसाचा प्रभाव वाढल्याने पटरी च्या खाली असलेले मोठे मोठे डब्बर घसरल्याने दहा ते बारा फूट खड्डा निर्माण झाला अशा परिस्थितीत डाऊन पटरीवरून मेमो ट्रेन बडनेरा कडे येत होती शेतकऱ्यांनी याची सूचना रेल्वे स्टेशनच्या संबंधित विभागाला दिली ताबडतोब मेमो ट्रेन माना जवळ थांबवण्यात आली जर या पटरीवरून ट्रेन निघून समोर गेली असती तर मोठी घटना घडली असती,

 अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासन व शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे हा मोठा अनर्थ टळला आहे तीन तासापासून मेमो ट्रेन थांबवण्यात आली आहे इतर ट्रेन सुद्धा थांबणार आहे पावसाचा जोर वाढलेला आहे पाऊस सुरू असतानाही खड्डा दुरुस्त करण्याचे काम रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी करत आहे प्रवासांना त्रास झाला परंतु अनेकांचे प्राण वाचले जर शेतकऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचे लक्षात आले नसते तर मोठी घटना घडली असती,