रायसिना फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा च्या 23 जुलै रोजी बार्शीटाकळी येथे आयोजन,
संवादाता,ज्ञानेश्वर निखाड़े
अकोला -- विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ज्ञानार्जन करीत प्रगतीच्या भावी शिखराकडे जातांना यशाचे अनेक उंबरठे नेत्रदिपक गुणवत्तेने पार करावेत.परंतू याचसोबत शिस्त, सामाजिक नीतिमुल्ये आणि नैतिकता तथा आदर्शांचे वास्तव धडे घ्यावेत.त्यातून सकारात्मक दृष्टीकोणाने आत्मबळ वाढवत उन्नत जीवनाच्या मार्गाने प्रवास करावा.या हेतुने समाजातील विद्यार्थी मेहनत करून शिक्षण पुर्ण करून उच्च पदावर शासकीय नोकरीत लागतात अश्या गुणवंतांचा
सत्कार सोहळा रविवार दिनांक 23 जलै 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता वसंतराव नायक सभागृह पंचायत समिति बार्शिटाकळी येथे आयोजित करण्यात आला आहे,
डॉ. रोनक पवार मेडीकल ऑफिसर, कारंजा आणि योगेश राठोड मंत्रालय क्लर्क यांचा सत्कार करण्यात येणार असुन ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने यशवंत पवार गोर गावणीया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे राहतील तर या कार्यक्रमासाठी शीरीष खंडारे ठानेदार बार्शिटाकळी ,छगन राठोड संस्थापक सनेस इसफार्म कंपनी ,सौ. वर्षा राठोड पोलिस निरीक्षक डाबकी रोड, डॉ वर्षा चव्हाण स्त्री चिकित्सक, डॉ वर्षा जाधव दंत व मुख रोग तज्ञ, डॉ ललिता चव्हाण, सौ संगीता जाधव माजी सभापती, सौ सरिता पवार सरपंच रेडवा, विनोद जाधव, अनिल चव्हाण, दिलीप चव्हाण, डॉ विजय चव्हाणडॉ अरविंद चव्हाण, डॉ सुनील चव्हाण, डॉ अमित जाधव, बलदेव जाधव, महादेव जाधव, अरविंद जाधव, डॉ शांतीलाल राठोड, अनिल राठोड, अशोक राठोड, प्रा महेश राठोड, वसंत राठोड, डॉ आशिष राठोड, अंबादास राठोड, बापूराव राठोड, दादाराव पवार, प्रमोद चव्हाण, शेर सिंग जाधव आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोर सिक वाडी गोर सेना कटमालो अकोला जिल्हा यांनी केले आहे,_________________________________________
0 Comments