जळगांव जिल्हा सी आर पी,व कॅडर कर्मचारी यांची बैठक जिल्हा पत्रकार भवन जळगांव येथे संपन्न,

जळगांव जिल्हा सी आर पी,व कॅडर कर्मचारी यांची बैठक जिल्हा पत्रकार भवन जळगांव येथे संपन्न,
जळगाव प्रतिनिधि,  शेख हक्कानी 

आज दिनांक 13- 7- 2023 रोजी माननीय ग्रामविकास मंत्री महोदय यांच्या सेवा सदन या ठिकाणी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस ग्रामविकास मंत्री महोदय यांचे खाजगी सचिव मा.श्री देशपांडे सर, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून श्री.कुलकर्णी सर,संघटना पदाधिकारी तसेच ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त सचिव आणि श्री जाधव सर, राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाकडून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. दिघे सर, अवर सचिव माननीय श्री. माळी सर इत्यादी उपस्थित होते. सदर बैठकीत खालील प्रमाणे चर्चा झाली.
१) कॅडर मानधनवाढ बाबतीत प्रस्ताव तयार केलेली असून सदर प्रस्ताव येत्या कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे
२) कर्मचारी मानधनवाढीच्या अनुषंगाने 30 ते 50 टक्के मानधन वाडी बाबत अभ्यास करून जुलै अखेर प्रस्ताव सादर करण्याबाबत राज्य अभियान व्यवस्थापन कक्षास सूचना देण्यात आल्या .त्याचबरोबर कोविड काळात दोन वर्ष गोठविण्यात आलेली पाच टक्के वेतन वाढ तात्काळ देण्याबाबत सूचना देण्यात आल्या
३) प्रभाग समन्वयक तसेच सहाय्यक कर्मचारी यांच्या जिल्हा बाह्य बदली संदर्भात सामंजस्य बदली करण्याबाबत राज्य अभियान व्यवस्थापन कक्षास यांना सूचना देण्यात आल्या.
४) IJP बाबतीत अनुभवी स्टाफ ला प्राधान्य देण्याची मागणी रास्त आहे परंतु सदरची बाब धोरणात्मक असल्याने सदरची बाब प्रक्रियाधीन आहे असे सांगण्यात आले
५) सी एस सी स्टाफ यांचे मानधन दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत अदा करण्याबाबतचे आदेश CSC HR यांना दुरध्वनीद्वारे देण्यात आले.
संघटना निर्णय:कोणताही शासन निर्णय 20 तारखे पर्यंत आला नाही तर आझाद मैदान आंदोलन दिनांक 25 जुलै रोजी अटल आहे *.जळगांव जिल्हा सी आर पी,व कॅडर कर्मचारी यांची बैठक जिल्हा पत्रकार भवन जळगांव* येथे संपन्न झाली यात अ एस पाटील सर,नेहत ताई साठे मॅडम,भारतीय कामगार संघटनेचे राज्य सचिव जहाँगीर ए खान,मनीषा ताई सपकाळे,चव्हाण मॅडम,आयेशा ताई मणियार,इत्यादी शेकडो महिला कर्मचारी उपस्थित होत्या,

Post a Comment

0 Comments