सराईत गुन्हेगारांस अटक करून त्यांचेकडून चोरीचे १६ मोबाईल फोन व रोख रक्कम हस्तगत


दिनांक २५/०६/२०२३ रोजी देवनार पोलीस ठाणे हद्दीत देवनार पशुवध केंद्रामधून बकरा विक्री करणा-या व्यापा-याचे खिशातून अज्ञात इसमाने रोख रक्कम चोरी केले बाबतची तकार देवनार पोलीस ठाणेस प्राप्त झालेवरून कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाच्या तपासाकरीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सोनावणे यांचे पथक तयार केले. सदर पथकाने तपासाबाबत कोणताही दुवा नसताना कौशल्यपुर्ण तपास करीत सदर गुन्हयात १ ) साबीर सिराज सय्यद, वय ३८ वर्षे, २) दस्तगीर उर्फ फिरोज साबीरहसन शेख, वय - ३२ वर्षे, ३) सलाम नईम खान, वय ३५ वर्षे, व्यवसाय- 'लबर, ४) अब्दुला मो. आरीफ शेख वय २५ वर्षे, ५) नासीर नईम खान वय ४२ वर्षे, धंदा मजुरी या सराईत गुन्हेगारांच्या टोळीस अटक करण्यात आली असून तपासादरम्यान नमुद टोळीकडून चोरीस गेलेल्या रोख रकमेपैकी रू. ६७,७००/- व देवनार पशुवध गृहामधील चोरीस गेलेले अंदाजे रू. १,७५,०००/- किमतीचे विविध कंपन्यांचे १६ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि कैलास सोनावणे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. विनायक देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०६ श्री. हेमराजसिंह राजपूत, सहायक पोलीस आयुक्त, देवनार विभाग श्री संजय डहाके, देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री राजेश केवले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री जहांगीर मुलाणी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास सोनावणे, पोउनि सुजाता बुधवंत, पोह शिंदे, आंब्रे, सांगळे, पोशि विशाल पाटील, राहुल पाटील यांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments