मेहरून तलावा वर जबरी चोरी करणारे आरोपींना जलगांव एमआयडीसी पोलीसांनी केले जेरबंद.
जलगांव, प्रतिनिधी शेख फरहान
शासकिय आयुर्वेदीक महाविदयाल जळगाव येथे बी ए एमस च्या 04 थ्या वर्षात वैदयकिय शिक्षण घेणारे हिमांशु शशीकांत कुटे रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, लाखाळा वाशिम हे दिनांक 11/07/2023 रोजी रात्री 12.00 वा चे सुमारास फिर्यादी हे मित्र देवेश संजय चव्हाण याचे सोबत मेहरुण तलाव परीसरात गप्पा मारत बसलेले असतांना समोरुन सी बी शाईन मो सा वर चार अनोळखी इसम आले व त्यांनी चाकु चा धाक दाखवून हिमांशु शशीकांत कुटे व त्याचा मित्र देवेश संजय चव्हाण अशांचे दोन 39500/- रुपये किंमतीचे दोन मोबाईल बळजरीने हिसकावून पळून गेले होते व हीमांशु कुटे याचेवर चाकुने हमला केला होता म्हणुन त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन चार अनोळखी इसम यांचेविरुध्द दिनांक 12/07/2023 रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात मा पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी गुन्हयाचा शोध घेणेकामी 1) पोउनी दिपक जगदाळे, 2) पोउनी रविंद्र गिरासे, 3) सफौ अतुल वंजारी अशांचे तीन वेगवेगळे पथके तयार करुन गुन्हा उघडकिस आणण्याच्या सूचना दिल्या.
सदर गुन्हयात वैदयकिय शिक्षण घेणा-या तरुण मुलांवर शस्त्राने हल्ला झाल्यामुळे तसेच गुन्हा मेहरुण ट्रॅकवर रात्रीच्या वेळी घडल्याने अशा संवेदनशील घटनेबाबत विशेष लक्ष घालून गुन्हा लवकरात लवकर उघडकिस आणावा अशा सुचना मा. पोलीस अधिक्षक श्री एम राजकुमार यांनी दिल्या होत्या. तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावीत जळगाव भाग जळगाव यांनी घटनास्थळाला भेट देवून तपासाबाबत मार्गदर्शन केले होते. गुन्हयाचे तपासात पोउनी दिपक जगदाळे, पोका छगन तायडे, किरण पाटील यांनी कोणताही ठोस पुरावा नसतांना केवळ फिर्यादी यांनी अनोळखी इसमाचे वर्णन सांगीतल्याचे आधारावरुन रेकॉर्डवरील एका गुन्हेगारास ताब्यात घेतले होते त्याचेजवळ सदर गुन्हयातील वापरलेली होंडा शाईन कंपनीची मो सा मिळुन आली होती. तसेच त्याला सखोल विचारपुस करता त्याने गुन्हयाची कबुली दिली.
तसेच त्याने व त्याचे सोबत असलेल्या इतर साथीदाराचे नाव व पत्ते सांगीतले होते. सदरची मो सा ही त्यांनी सम्राट कॉलनी जळगाव येथून चोरली होती. मो सा ही दत्ता गोविंदा हिवराळे यांच्या मालकिची होती ती त्यांनी घटना घडण्याच्या अगोदर रात्री 11.00 वा चोरली होती. पहील्या आरोपीने दिलेल्या माहीती नुसार त्याचे सोबत असलेल्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले असुन त्यांचेकडुन फिर्यादी यांचे चोरीस गेलेले दोन 39500/-रुपये किंमतीचे मोबाईल फोन व गुन्हयात चोरी करुन वापरलेली दत्ता गोविंदा हिवराळे यांची 40,000/- रुपये किंमतीची होंडा शाईन कंपनीची व अजुन एक 40,000/- रुपये किमतीची सुप्रीम कॉलनी परीसरातून चोरलेली मोटर साईकल असा एकूण 119,500/- रुपये चा किंमती मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याशिवाय वरील आरोपींनी एक घरफोडी, दोन मो सा चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांचेकडुन एकुण 04 गुन्हे उघडकिस आणले आहेत. एकुण 103 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन एक आरोपी पसार झालेला आहे त्याचा शोध सुरु आहे. आरोपी यांची ओळखपरेड घेणे असल्याने त्यांना आज रोजी मा. न्यायमुर्ती श्रीमती सुवर्णा कुळकर्णी यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची मॅजिक. रीमांड दिलेली आहे. आरोपी यांची ओळखपरेड बाकि असल्याने त्यांची नावे हो गोपणीय ठेवण्यात आलेली आहे.
सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, रविंद्र गिरासे, सफी अतुल वंजारी, पोहेका. सचीन मुंढे, पोना. किशोर पाटील, विकास सातदीवे पोका, छगन तायडे, किरण पाटील, योगेश बारी, इश्वर भालेराव, चंद्रकांत पाटील, ललीत नारखेडे यांनी केली आहे. सदर आरोपी पैकी एकावर 16 गुन्हे, दुस-या आरोपीवर 04 गुन्हे, तीस-या आरोपीवर 01 गुन्हा असे दाखल आहे. सदरचा गुन्हा घडल्यानंतर 06 तसांतच एमआयडीसी पोलीसांनी आरोपीबाबत माहीती काढून चार गुन्हे उघडकिस आणुन गुन्हयातील मुद्देमाल जप्त केलेला आहे.
0 Comments