सोयगांव तालुक्यातील फर्दापूर तांडा येथे दानशूर व्यक्तिमत्त्व आदरणीय सौ.छायाबाई विजयजी चोरडीया ताई यांच्या तर्फे वहयांचे वाटप,

सोयगांव तालुक्यातील फर्दापूर तांडा येथे दानशूर व्यक्तिमत्त्व आदरणीय सौ.छायाबाई विजयजी चोरडीया ताई यांच्या तर्फे वहयांचे वाटप,
फर्दापूर (प्रतिनिधि ) हक्कानी शेख

सोयगांव तालुक्यातील फर्दापूर तांडा येथे दानशूर व्यक्तिमत्त्व आदरणीय सौ.छायाबाई विजयजी चोरडीया ताई यांच्या तर्फे तसेच सोबत श्री.प्रशांत दादा जैन,सौ.दर्शना प्रशांत जैन,सौ.अपर्णा पंकज लोढा,कुमारी.विरा पंकज लोढा यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी चार चार वह्यांचे वाटप करण्यात आले.ते नेहमीच गरजू विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वह्यांचे वाटप करतात. त्यांच्या मते देवाने आम्हाला खूप काही दिले आहे, त्यामुळे आमच्या हातून काहीतरी समाज उपयोगी कार्य घडत रहावे व गरजू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांचे भविष्य उज्वल व्हावे याच हेतूने ते अशाप्रकारे मदत करत असतात.यावेळी शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.वाल्मीक चव्हाण तसेच मुख्याध्यापक श्री. रविंद्र साळुंके,शिक्षक वृंद श्री.विठ्ठल पाटील,श्री.दीपक बावस्कर यांनी त्यांचा सत्कार केला व शाळेतील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला,नवतरुण व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments